घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: सुशांतचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अपूर्ण

Sushant Suicide Case: सुशांतचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अपूर्ण

Subscribe

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून आज सीबीआयचे ऑफिसर बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच हा प्रश्न कायम आहे की, ही आत्महत्या की हत्या? चाहते देखील देखील या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आता या प्रकरणाबाबत मोठे कव्हर अप समोर येणार असल्याचा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांचा विश्वास आहे.

कव्हर अप म्हणजे जो कोणी संपूर्ण प्रकरण लपवण्याचा प्रयत्नकरित आहे. यामध्ये प्रशासन देखील मदत करत आहे. आज तक या वृत्तसंस्थेशी बोलताना विकास सिंह यांनी सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर देखील प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

विकास सिंह म्हणाले की, ‘डॉक्टर गुप्ता हे प्रकरण प्रोफेशनल दृष्टीकोनातून पाहतील. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार आता मुंबई पोलीस सीबीआय चौकशीत अडथळा आणण्याचा विचारही करू शकत नाहीत. दरम्यान सुशांत पोस्टमार्टममध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. मृत्यू होण्यापूर्वी सुशांतने जूस घेण्याचे समोर आले होते. पण रिपोर्टमध्ये जूसचा कुठे उल्लेख केला नाही आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ देखील लिहिलेली नव्हती. या प्रकरणात फॉरेन्सिकची खूप महत्त्वाची भूमिका आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट सविस्तरपणे का देण्यात आला नाही? सुशांतच्या चेहऱ्यावरील खुणाचा उल्लेख नाही. योग्य तपास केल्यास अनेक गोष्टी उघडकीस येऊ शकतात’

- Advertisement -

हेही वाचा – सुशांतच्या घरातून निघाल्यानंतरचे रिया- महेश भट्ट यांचे ‘ते’ Whatsapp Chat व्हायरल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -