घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: दिशाच्या मृत्युनंतरही तिचा फोन होता Active!

Sushant Suicide Case: दिशाच्या मृत्युनंतरही तिचा फोन होता Active!

Subscribe

बॉलिवू़ड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. यादरम्यान दिशा सालियाशी संबंधिक एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की, दिशाच्या मृत्यूनंतर कित्येक दिवसांपर्यंत तिचा फोन Active होता. हा फोन वापरला जात होता आणि त्यातून फोन कॉल करण्यात आले होते.

माहितीनुसार, दिशा सालियानच्या आत्महत्येचा संबंध अगोदरपासून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी लावला जात होता. वृत्तानुसार, दिशाने आत्महत्या करण्यापूर्वी सुशांतसिंह राजपूत याच्याशी बोलली होती आणि सुशांत पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी समोर आणू इच्छित होता. पण दिशा-सुशांत आत्महत्याप्रकरणी काही लिंक आहे यावर दिशाचे आई-वडिलांनी स्पष्ट सांगितले होते की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करू नका.

- Advertisement -

मात्र दिशाच्या फोनशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर अनेक नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की, फॉरेन्सिक तपासणीसाठी दिशाचा फोन का जप्त केला गेला नाही?, दिशाचा फोन वापरणारा कोण होता?, हे फोन कॉल केले होते का? पोलीस कशाप्रकारे तपास करत होती, की चौकशीसाठी फोन घेण्यात आला नव्हता?

दिशाचे ८ जून रोजी निधन झाले आणि तिचा फोन १७ जूनपर्यंत Active असल्याचे आढळले आहे. दिशाच्या फोनवरून इंटरनेट कॉलिंगशी संबंधित अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की, सुशांत आणि दिशाच्या आत्महत्येशी खरोखर काही संबंध नव्हता का?

- Advertisement -

हेही वाचा – ‘पोस्टमॉर्टमच्या १०-१२ तास आधीच सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू!’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -