घरमनोरंजनफक्त 2 महिन्यात सुष्मिता आणि ललितचा झाला ब्रेकअप; सोशल मीडियावर चर्चांणा उधाण

फक्त 2 महिन्यात सुष्मिता आणि ललितचा झाला ब्रेकअप; सोशल मीडियावर चर्चांणा उधाण

Subscribe

अलीकडे सुष्मिता वारंवार तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसून येते. तसेच आता ललित मोदीने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुष्मिताचे नाव देखील काढले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्यांच्या नात्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केलं होतं. इतकचं नव्हे तर त्या सुष्मिता सेन आणि ललित मोदीने त्या ट्रोलर्संना सडेतोड उत्तर देखील दिलं होतं. दरम्यान, आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सुष्मिता आणि ललित मोदीचा ब्रेकअप झालेला आहे. याचं कारण म्हणजे अलीकडे सुष्मिता वारंवार तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसून येते. तसेच आता ललित मोदीने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुष्मिताचे नाव देखील काढले आहे.दरम्यान, ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात येताच आता नेटकरी सोशल मीडियावर ललित आणि सुष्मिताचा ब्रेकअप झाला असल्याची चर्चा करू लागले आहेत.

ललित मोदीच्या इंस्टा बायो मध्ये होते सुष्मिताचे नाव

- Advertisement -


ललित मोदीने जुलै 2022 मध्ये सुष्मितासोबतच्या नात्याची घोषणा केल्यानंतर इंस्टाग्राम अकाऊंटवर सुष्मितासोबतचा फोटो ठेवला होता, तसेच त्याच्या बायोमध्ये सुष्मितासोबत नव्या आयुष्याची सुरूवात केली असल्याचं लिहिलं होतं. तसेच तिचे नाव देखील मेन्शन केले होते.

- Advertisement -

परंतु आता ललितने दोघांचा फोटो काढला आहे, शिवाय सुष्मिताचे नाव देखील बायोमधून काढलेले आहे. त्यामुळेच त्यांच्या मध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज लावला जात आहे.

सोशल मीडियावर चर्चांणा उधाण
ललित मोदीकडून इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये बदल झाल्यानंतर सुष्मिता आणि त्याचा ब्रेकअप झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


हेही वाचा : नागार्जुनने दिला आलिया-रणबीरला ‘हा’ खास आर्शीवाद; एकूण दोघेही लाजले

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -