घरमनोरंजनललित मोदी जवळचे पैसे संपले का?...सुष्मिता आणि रोहमनला पुन्हा एकत्र पाहून सोशल...

ललित मोदी जवळचे पैसे संपले का?…सुष्मिता आणि रोहमनला पुन्हा एकत्र पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

Subscribe

मुंबईमध्ये एका शॉप समोर सुष्मिता सेनला आधीचा बॉयफ्रेंड रोहमन सोबत स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी सुष्मिताची मुलगी रेनी देखील त्यांच्यासोबत दिसून आली. हा व्हिडीओ समोर येताच लोक सुष्मिता सेनला ट्रोल करू लागले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मागील अनेक दिवसांपासून ललित मोदी सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ललित मोदीने सुष्मिता सेनसोबत असलेल्या नात्याचा सोशल मीडियाद्वारे खुलासा केला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या नात्याला ट्रोल देखील केलं होतं. दरम्यान, आता सोशल मीडियावर सुष्मिता सेन आणि तिचा आधीचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचे काही नवीन फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागले आहेत. ज्यामध्ये सुष्मिता सोबत तिची मुलगी रेनी सेन सुद्धा दिसत आहे.

सुष्मिता आणि रोहमन पुन्हा एकत्र?

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

मुंबईमध्ये एका शॉप समोर सुष्मिता सेनला आधीचा बॉयफ्रेंड रोहमन सोबत स्पॉट करण्यात आलं. त्यावेळी सुष्मिताची मुलगी रेनी देखील त्यांच्यासोबत दिसून आली. हा व्हिडीओ समोर येताच लोक सुष्मिता सेनला ट्रोल करू लागले आहेत. या वेळी सुष्मिताने सांगितल की, तिच्या लहान मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे ती तिच्यासाठी खरेदी करायला आली होती.

ललित मोदी जवळचे पैसे संपले का?
पुन्हा एकदा रोहमनसोबत सुष्मिताला पाहून सोशल मीडियावर युजर्सने सुष्मिताला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. तर काहीजण रोहमन आणि सुष्मिताला एकत्र पाहून खुश झाले आहेत. या युजर्सपैकी एकाने लिहिलंय की, ललित मोदी जवळचे पैसे संपले का? तर दुसऱ्या एकाने लिहिलं, ललित मोदी कुठे आहे?

- Advertisement -

सुष्मिता सेन आणि रोहमान एकत्र

मागील काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेन, रोहमन शॉल याला डेट करत होती. तो तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. मागच्या वर्षी दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याचा खुलासा खुद्ध सुश्मिता सेन हिनेच केला होता. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रोहमन सोबतच्या ब्रेकअपनंतर सुष्मिताने ललित मोदीसोबत नात्यात असल्याचा खुलासा केला होता.


हेही वाचा :ललित मोदीसोबतच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर सुष्मिता सेन एक्स बॉयफ्रेंडसोबत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -