बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिता बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने तिची लव्ह लाईफ कधीही कोणापासून लपवून ठेवली नाही. सुष्मिता मागील बऱ्याच वर्षांपासून मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती. परंतु 2021 मध्ये, सुष्मिताने ते दोघे वेगळे झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर 2022 मध्ये सुष्मिता भारतातून पळून गेलेला उद्योजक ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमध्ये आली होती. मात्र, त्यांच नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही. अशातच, आता पुन्हा सुष्मिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा एक फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल पुन्हा एकत्र?
View this post on Instagram
नुकताच सुष्मिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुष्मिता आणि रोहमन ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत असून रोहमनने सुष्मिताचा हात हातामध्ये घेतला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून याचं पॅचअप झाल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दिवाळी पार्टीमध्ये पोहोचले होते सुष्मिता-रोहमन
सुष्मिता आणि रोहमनचा हा व्हायरल व्हिडीओ बॉलिवूड निर्माता विशाल गुरानीच्या दिवाळी पार्टीतील आहे. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.