घरमनोरंजनसुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचं पॅच अप? 'या' फोटोमुळे चर्चेला उधाण

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचं पॅच अप? ‘या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिता बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने तिची लव्ह लाईफ कधीही कोणापासून लपवून ठेवली नाही. सुष्मिता मागील बऱ्याच वर्षांपासून मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती. परंतु 2021 मध्ये, सुष्मिताने ते दोघे वेगळे झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर 2022 मध्ये सुष्मिता भारतातून पळून गेलेला उद्योजक ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमध्ये आली होती. मात्र, त्यांच नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही. अशातच, आता पुन्हा सुष्मिता आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा एक फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल पुन्हा एकत्र?

- Advertisement -

सुष्मिता सेन आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे व्हायरल झालेले फोटो हे पाहिल्यानंतर हे दोघेही पुन्हा एकत्र आल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत. खरं तर, सुष्मिता नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत मुंबईत आली होती. सुष्मिता सेनने तिच्या इंस्टा स्टोरीवर या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रोहमन शॉलकडे अतिशय प्रेमळ आणि रोमँटिक अंदाजात दिसत आहे. शिवाय हा फोटो शेअर करत सुष्मिताने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘रोहमन शॉल खूप छान फोटो आहे’.

- Advertisement -

सुष्मिताच्या या स्टोरीला रोहमनने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्याने “मी तुझ्या जवळ आहे” असं लिहिलं आहे. या दोघांना पुन्हा एकत्र पाहून आता त्यांचे चाहते देखील खुश झाले आहेत.

सुष्मिता सेनने 2 मार्चला दिली होती हृदयविकाराच्या झटक्याची बातमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेनने 2 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. तिने सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही बसवण्यात आले आहेत. मात्र, आता सुष्मिता सेनच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. तिने योगासोबत वर्कआऊटही करायला सुरुवात केली आहे.


हेही वाचा :

परिणीतीच्या मुंबईतील घराला रोशनाई; उद्या होणार एंगेजमेंट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -