घर मनोरंजन सुष्मिता सेनने 'या' कारणास्तव अक्षय कुमारचा सिनेमा सोडला होता

सुष्मिता सेनने ‘या’ कारणास्तव अक्षय कुमारचा सिनेमा सोडला होता

Subscribe

हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाल्यास तर सुष्मिताचे नाव जरुर घेतले जाते. माजी मिस युनिवर्स सुष्मिता आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत राहते. सध्या ती आपला लेटेस्ट सिनेमा ‘ताली’ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या यामधील भुमिकेचे फार कौतुक ही केले जात आहे.

याच दरम्यान एका मुलाखतीत सुष्मिता सेनने काही मोठा खुलासा केला आणि म्हटले की, माझी मुलगी रेनी सेन हिच्यासाठी तिने अक्षय कुमार सोबतच्या एका मोठ्या सिनेमाचे शुटिंग अर्धवट सोडले होते. यामागील कारण ही तिने सांगितले आहे.

- Advertisement -

वयाच्या 24 व्या वर्षात सुष्मित सेन सिंगल मदर झाली होती. त्यावेळी तिने दोन मुली एक रेनी आणि अलीशा यांना दत्तक घेतले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत ती या मुलींचा सांभाळ एका आई-वडिलांप्रमाणे करते. नुकत्याच बरखा सिंह इन द मोजो स्टोरी दरम्यान सुष्मिताने या गोष्टीचा उल्लेख केला की, मुलगी रेनीच्या कारणास्तव तिने अक्षय कुमारचा एक मोठा सिनेमा सोडला होता.

अभिनेत्रीने असे म्हटले की, मला अक्षय कुमार आणि करीना कपुर यांच्या सोबत एका लोकप्रिय सिनेमात महत्त्वाची भुमिका साकारायची होती. मात्र शुटिंग मध्येच सोडावी लागली. कारण मुलगी रेनी ही खुप आजारी होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रेनी माझ्यासाठी खुप काही आहे. ती माझ्या आयुष्यात अशावेळी आली जेव्हा सर्वकाही व्यवस्थितीत सुरु नव्हते. तिची तब्येत खुप बिघडली होती.

- Advertisement -

मी अक्षय आणि करीना सोबत कॅनडात सिनेमाचे शुटिंग करत होती. खरंतर तो सिनेमा मल्टीस्टार होता. मला मुंबईतून फोन आला की, माझे वडील रेनीची काळजी घेत आहे. त्यांनी म्हटले की, तिला रुग्णालयात दाखल केले असून ती खुप सीरियस आहे. मी मुंबईत आली आणि आल्यानंतर वडिलांना असे म्हटले की, मला माहितेय हा माझ्या करियरचा अंत आहे. मला खुप वाईट वाटतेय.

मी कोणताही विचार न करता सिनेमा सोडला आणि परतली. जेव्हा रेनी एक आठवडाभर रुग्णालयात होती तेव्हा मी पुन्हा कामावर परतण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत माझे फार नुकसान झाले होते. दरम्यान, सुष्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तर आगामी काळात ती प्रसिद्ध सीरिज ‘आर्या सीजन-3’ मध्ये झळकणार आहे. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा- सुष्मिताने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

- Advertisment -