Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनSushmita Sen : सुष्मिताची लगीनघाई, वयाच्या 49 व्या वर्षी शोधतेय परफेक्ट पार्टनर

Sushmita Sen : सुष्मिताची लगीनघाई, वयाच्या 49 व्या वर्षी शोधतेय परफेक्ट पार्टनर

Subscribe

सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग बराच मोठा असून सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सची संख्या चांगली आहे. वयाच्या 49 व्या वर्षीसुद्धा सुष्मिता सिंगल लाईफ जगतेय. पण अनेकदा तिच्या अफेअर्सची चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशनमध्ये सुष्मिताने चाहत्यांसोबत गप्पा मारताना लग्नाविषयी स्वतःचे मत व्यक्त केले आहे. यावेळी सुष्मिताने ती लग्न करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. (Sushmita Sen is looking for a suitable partner to marry)

या लाईव्ह सेशनदरम्यान सुष्मिताने जयपूरला एका लग्नसोहळ्यात उपस्थित राहिल्याचे सांगितले. यावर एका युजरने सुष्मिताला तिचा लग्नाचा काय प्लॅन आहे? असे विचारले. ज्यावर उत्तर देताना तिने योग्य जोडीदार शोधण्याच्या महत्त्वावर भाष्य केले. ती म्हणाली, ‘मलासुद्धा लग्न करायचंय. पण त्यासाठी लग्नालायक कोणी मिळायला तर हवा. असंच लग्न होईल का? हृदयाचं नातं हे फार रोमँटिक असतं असं म्हणतात. मग एखादी व्यक्ती आपल्या हृदयापर्यंत तरी पोहचायला हवी ना. तर लग्नसुद्धा होईल’.

मध्यंतरी अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान मॉडेल-अभिनेता रोहमन शॉल यांचं नातं चर्चेत आलं होतं. त्यांच्या वयातील अंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. सुष्मिता आणि रोहमन काही वर्ष डेट करत होते. पण 2021 मध्ये त्यांनी ऑफिशियल ब्रेकअप जाहीर केला. ब्रेकअपनंतरसुद्धा त्यांच्यात चांगली मैत्री असून अनेकदा ते एकत्र स्पॉट होतात. रोहमनला बऱ्याचवेळा सुष्मिता आणि तिच्या कुटुंबीयांसोबत स्पॉट करण्यात आलंय. रोहमननंतर सुष्मिताचे नाव आयसीसीचे माजी अध्यक्ष ललित मोदींसोबत जोडले गेले. दोघांचे मालदीव व्हेकेशनचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

सध्या सुष्मिता सिंगल असून २ मुलींची आई आहे. मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असताना तिने 2 मुलींना दत्तक घेतले होते. सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमनचे या मुलींसोबत खूप चांगले नाते आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतो. त्यामुळे अजूनही चाहत्यांना सुष्मिता- रोहमनमध्ये पुन्हा पाहिल्यासारखं नातं निर्माण होण्याची आशा आहे.

हेही पहा –

Sai Tamhankar : मला भीती वाटते, क्राइम बीटच्या अ‍ॅक्शन सीन्सबद्दल काय म्हणाली सई?