हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता सेनने केली वर्कआऊटला सुरुवात; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. याबाबत तिने स्वतः एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत खुलासा केला होता. सुष्मिता सारख्या फिटनेस फ्रीक अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी कळताच अनेकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, आता सुष्मिताची प्रकृती पूर्वीपेक्षा व्यवस्थित आहे. कारण पुन्हा एकदा स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित करत सुष्मिता योगा करायला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता सेनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती योगा करताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “व्हील ऑफ लाईफ, माझ्या कार्डियोलॉजिस्टने मला परवाणगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरु झाली आहे. काय मजेशीर अनुभव आहे…ही माझी हॅप्पी होळी आहे, तुमची कशी आहे? तुम्हा सर्वांना खूप सारं प्रेम” असं सुष्मिताने लिहिलंय.

वडीलांसोबतचा फोटो शेअर करत दिली होती माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

काही दिवसांपूर्वी सुष्मिताने आपल्या वडीलांसोबतचा एक फोटो शेअर करत तिच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी दिली होती. या पोस्टमध्ये सुष्मिताने आपल्या वडीलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, “माझ्या वडीलांचे काही शब्द- आपल्या हृदयाला नेहमी आनंदी आणि साहसी ठेवा, आणि हे तेव्हा तुम्हाला साथ देईल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल. नुकताच मला हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. अँजिओप्लास्टी करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी मला सांगितले की, माझं हृदय खूप मोठ्ठ आहे.”


हेही वाचा :

स्वरा भास्करने शेअर केली अनोखी निमंत्रण पत्रिका; सोशल मीडियावर होतेय व्हायरल