घरमनोरंजनसुष्मिता सेनला 'आर्या 3' शूटिंग दरम्यान आला Heart Attack

सुष्मिता सेनला ‘आर्या 3’ शूटिंग दरम्यान आला Heart Attack

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. याबाबत तिने स्वतः एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत खुलासा केला होता. सुष्मिता सारख्या फिटनेस फ्रीक अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी कळताच अनेकांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान, आता सुष्मिताची प्रकृती पूर्वीपेक्षा व्यवस्थित आहे. दरम्यान, अशातच सुष्मिताच्या ‘आर्या 3 ‘ वेब सीरीजमध्ये सुष्मिताचे सहकलाकार विकास कुमारने सुष्मिताला शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका कसा आला याबाबत सांगितलंय.

जयपूरमध्ये सुष्मिता सेनला आला होता हृदयविकाराचा झटका

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना अभिनेता विकास कुमारने सांगितलं की, ‘आर्या 3’ चा मोठा भाग शूट करण्यात आला आहे. हा शो राजस्थानवर आधारित आहे. त्यात काही आऊटडोअर सीन्स आहेत, जे आम्हाला जयपूरमध्ये शूट करायचे होते. आम्ही तिथे पोहोचलो, पण दुर्दैवाने सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला. सुरुवातीला आम्हाला याबद्दल माहिती नव्हती, परंतु काही दिवसांनी आम्हाला कळले, जेव्हा त्यांनी सोशल मीडियावरुन माहिती दिली होती.

- Advertisement -

विकास पुढे म्हणाले की, ‘सुरुवातीला सुष्मितालाही कळत नव्हते की तिला नक्की काय झाले? तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. तेव्हा तिला कळाले आणि त्यानंतर तिने हे सर्वांना सांगितले. जयपूरमध्ये आम्ही फक्त एक दिवस शूट केले आणि नंतर आम्हाला समजले की आम्ही आणखी शूट करू शकत नाही. त्यानंतर शूटिंग थांबवण्यात आले.

सुष्मिता सेनने 2 मार्चला दिली होती हृदयविकाराच्या झटक्याची माहिती

सुष्मिता सेनने 2 मार्च रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. तिने सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही बसवण्यात आले आहेत. मात्र, आता सुष्मिता सेनच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. तिने योगासोबत वर्कआऊटही करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

आजच्या पुढाऱ्यांमध्ये सुसंस्कृतपणाची कमतरता, शरद पवार यांची खंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -