Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सुष्मिता सेनला आला होता हृदय विकाराचा झटका; पोस्ट शेअर करत स्वतः दिली...

सुष्मिता सेनला आला होता हृदय विकाराचा झटका; पोस्ट शेअर करत स्वतः दिली माहिती

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनला हृदय विकाराचा झटका आला असल्याचं स्वतः तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिली आहे. ही बातमी कळताच सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

सुष्मिताने शेअर केली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या वडीलांसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, “तुमचे हृदय मजबूत आणि आनंदी ठेवा, हे नेहमी तुमच्यासोबत तुमच्या कठीण काळात उभे राहिल. जेव्हा तुम्हाला याची सर्वात जास्त गरज असेल. हे महान शब्द माझ्या वडीलांचे होते. मला दोन दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला होता. माझी अँजिओप्लास्टी झाली. आता सर्वकाही ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितलंय की, माझे हृदय खरोखर मोठे आहे.”

- Advertisement -

सुष्मिताने पुढे लिहिलंय की, “बरेच लोक आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छिते. ज्यांमुळे मला वेळेवर उपचार मिळू शकले. त्यांच्या तत्परतेमुळे मी सावरले. तेही मी पुढच्या पोस्टमध्ये सांगेन. मी ही पोस्ट माझ्या प्रियजनांना अपडेट देण्यासाठी केली आहे.” दरम्यान, सुष्मिताची ही पोस्ट वाचून सर्वांनाच धक्का बसला. अनेकांनी तिला ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

आनंद पिंपळकर यांचा ‘वास्तुशास्त्र’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -