Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सुष्मिता सेन : तालीचा गजर घुमत राहिला पाहिजे

सुष्मिता सेन : तालीचा गजर घुमत राहिला पाहिजे

Subscribe

– हर्षदा वेदपाठक

आर्या या वेब सिरीज नंतर सुश्मिता सेन ताली या सिरीजसह तयार आहे. श्रीगौरी सावंत हिच्या जीवनावर ताली हि सिरीज आधारित आहे. ऐका किन्नरचा प्रवास आणि तिला समाजात असेल स्थान यावर हा चित्रपट आधारित आहे. आतापर्यंत कोणीही किन्नरची व्यक्तिरेखा पडद्यावर मान देऊन रंगवलेली नाही, असे म्हणणारी सुष्मिता मध्ये अनेक वर्ष चित्रपट पासून लांब होती. या सगळ्यांवर तिच्याबरोबर केलेली बातचीत.

- Advertisement -

तु जेव्हा ताली हे शीर्षक ऐकले तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय झाली ?

सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ठरले नव्हते. आम्ही जे नाव ठरवले होते त्या शीर्षकाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. दुर्गा पुजा होती त्या दिवशी आम्ही चित्रकरण करत होतो. एकदम सामान्य आणि लोकांच्या सहज लक्षात राहील असे नाव ठेवायचे ठरले. तसेच या समुदायाचे प्रतिनिधित्व करेल परंतु त्यांना कुठेही त्या शीर्षकांमुळे अपमान जनक वाटू नये असे शीर्षक ठेवायचे ठरले आणि माझ्या तोंडातून, ताली हा शब्द निघाला. बस मग काय ठरले आमचे शीर्षक.

- Advertisement -

ताली हा चित्रपट करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तुझ्या विचारांमध्ये कितपत फरक पडला?

माझ्यासाठी हा विषय नविन नाही. आपण कोणत्याही समुदायाचा आवाज दाबू नये. त्यांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे आणि त्यांचे आयुष्य सन्मानाने जगू दिले पाहीजे. आपण सर्वांनीच त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. या विचारांची आहे मी.

आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे ताली या विषयासाठी. मला वाटते या विषयाला काही प्रेरणादायी बनवत असेल, तर ती गौरीची गोष्ट आहे. जेंव्हापासून आम्ही गौरीच्या कथेवर संशोधन सुरु केले, तेंव्हापासूनच आम्हाला गौरी खूप भावली. आम्हाला वाटायचे आम्ही हे नाव ऐकले आहे, म्हणजे आम्हाला तिच्याबद्दल सर्व काही माहित आहे. पण संशोधनांती, तिला आणि इतरांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर आमच्या पूर्वकल्पना आणि समज बदलला. माझ्या मते, तालीच्या प्रवासा दरम्यान अनेक गोष्टी घडल्या, ज्याद्वारे आम्हाला खूप शिकायला मिळाले.

यापूर्वी मोठ्या पडद्यावर दाखवता न येणारे कठीण विषय दाखविण्याचे श्रेय तू ओटीटी माध्यमाला देशील का?

मी नव्वदच्या दशकातून आलेली आहे. नाझ इमारतीत असलेल्या वितरण व्यवस्थेतून मी आलेली आहे. त्यामुळे चित्रपटाचा अनेक वर्षाचा काळ डोळ्यासमोर मी बघितला आहे. तेव्हा ताली सारखा विषय कधीच तयार होवू शकला नसता. माझ्या अनुभवातून सांगायचे तर, मला चित्रपटांकडे परत येताना जे काम करण्याची दुसरी संधी मला मिळाली आहे. ती फक्त ओटीटी ने आम्हाला काही वेगळे करण्याची परवानगी दिल्यामुळेच… आता मी माझे काम मोठ्या स्तरावर प्रेक्षकांसमोर घेऊन जाऊ शकते. आणि मला या व्यासपीठाविषयी प्रचंड आदर आहे. आपण सगळ्यांनीच किन्नरांच्या कथा आणि व्यक्तिरेखा विविध चित्रपटांतून पाहिल्या आहेत. पण एखादी किन्नर व्यक्तिरेखा आदरणीय पद्धतीने सादर केल्याचे मला आठवत नाही. याचे सगळे श्रेय आमच्या दिग्दर्शकाला जाते, कारण त्यांना गौरीली आदरपूर्वक सादर करायचे होते.

तुला एखाद्या चरीत्रपट करायला आवडेल का?

मला कोणतेही प्रेरणादायी काम करायला आवडेल. ठराविक अश्या कोणत्याही विषयावर मी विचार केलेला नाही. गौरीवर आधारित चरीत्रपट मिळेल याची कोणतीही योजना नसतानाच तो मिळणे. ही एक चांगली गोष्ट आहे. मी माझे सगळे पर्याय खुले ठेवणार आहे. जेंव्हा कधी मला संधी मिळेल, तेंव्हा ती स्विकारण्यात मला आनंदच होईल.

मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

मराठी कलाकार फारच चांगले आहेत. अगदी दिड दिवसाचे दृष्य असेल तरी माझी झोप उडायची, कारण ते पूर्ण तयारीने यायचे. ते कमालीचे असे रंगभूमीवरील कलाकार होते. त्यांना सतत परिपूर्णतेचाच ध्यास असल्याने तुम्हालाही तुमच्या कामाची उंची वाढवावी लागते. अनेक नवीन कलाकार हे एकदम सळसळत्या रक्ताचे आहेत. अतिशय प्रामाणिकपणे आणि सखोलपणे त्यांनी काम केले आहे. मग ते, नंदू माधव, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी आणि इतर या सगळ्यांनी उत्तम काम केले आहे.

मध्यंतरी तु काही काळ चित्रपटसृष्टी पासून लांब गेली होतीस, काय कारण होते?

माझ्या लहान मुलीसाठी मी गॅप घेतला होता. जेव्हा ती घरी आली तेव्हा ती फक्त एका महिन्याची होती आणि मला त्या मुलीला मी आणि आई यांचा बाँड असतो, तो सिद्ध करायचा होता. मला त्यादरम्यान मला जे काम मिळत होते, ते माझ्या मुलीला मागे ठेवून घराबाहेर पडण्यासारखे नव्हते. या वेळेला मी एक स्त्री म्हणूनच विचार केला. आपल्या मुलीला मागे घरात एकटे ठेवायचे, तर ते काम तेवढे महत्वाचे असायला पाहिजे. तसं काही काम मला मिळालं नाही. गेलेला वेळ परत येणार नव्हता. आणि लोक तुम्हाला घाबरवतात, तुमचं वय वाढत आहे, घरात का बसता, चला उठा बाहेर पडा, कामाला लागा. मी असं कोणाचे काहीच ऐकलं नाही. आणि जे काही घडायचं असतं ते त्या वेळेला घडत राहते. तुम्हाला फक्त त्यासाठी थांबायचे असते. पण ते थांबणं देखील फार कठीण काळ असतो. गेले आहे मी त्या काळातून. त्यानंतर मी, माझ्या आवडत्या कामाकडे वळली आणि सेकंड इनिंग सुरू केली.

ताली या चित्रपटानंतर समाजाचा किन्नरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का?

हो नक्कीच.

मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन दिलबर दिलबर करत लोकांच्या दिलामध्ये घुसली, त्यानंतर आता ताली वाजवेपर्यंत तुझा प्रवास कसा काय झाला?

माझा प्रवास एका विद्यापीठाप्रमाणे झाला. मला वाटते की मी एखाद्या गोष्टी खूप उत्तम आहे. परंतु प्रत्यक्ष ते करताना मात्र मी तोंडावर पडते. मग तुम्ही माघारी फिरता, परत येता. ते विचार करता.. परत काही नवीन शिकून परत काम करूया…करता.. मग तुम्हाला थोडं थोडं यश मिळू लागते. आणि त्याने प्रेरित होऊन तुम्ही परत जोमाने कामाला लागता. एकंदरीत माझा प्रवास हा, शिकणे.. पुन्हा शिकणे आणि पाटी कोरी करून परत शिकणे या सभोवतीच फिरत राहिला. जोपर्यंत देव मला ताकद देत राहील, तोपर्यंत मी याच पद्धतीने काम करत राहीन. एकंदरीत सुंदर राहिला माझा प्रवास.
मी 1990 च्या दशकातील अभिनेत्री आहे. त्यामुळे 1990 नंतर 2023 पर्यंत मला खूप नवीन गोष्टी शिकाव्या लागल्या. आणि यापुढेही शिकत राहीन.


हेही वाचा- अफलातून आर. माधवन

- Advertisment -