घर मनोरंजन सुष्मिताने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

सुष्मिताने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त सुष्मिता तिच्या पर्सनल आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते. नुकत्याच एका मुलाखतीत सुष्मिताला लग्न का केले नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सुष्मिताने एक वक्तव्य केलं जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सुष्मिताने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

आत्तापर्यंत सुष्मिताचे अनेक पुरुषांसोबत जोडले गेले. मात्र, 47 वर्षाच्या सुष्मिताने अजूनही लग्न केलेले नाही. सुष्मिताच्या दोन मुली आहेत ज्या तिने दत्तक घेतल्या आहेत. अशातच, नुकत्याच एका मुलाखतीत सुष्मिताला लग्न न करण्याचे कारण आणि तुमच्या मुलींना वडीलांची कमतरता भासत नाही का? असे प्रश्न विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, “अजिबात नाही, माझ्या मुलींना वडीलांची गरज नाही. तुम्ही तेच मिस करता जे तुमच्या जवळ आहे. जे तुमच्याकडे कधीच नव्हतं त्याची तुम्हाला आठवण कशी येईल.” जेव्हा मी त्यांना मला लग्न करायचंय असं सांगते तेव्हा त्या मला “का? कशासाठी” असं विचारतात.

अनेकांसोबत जोडले गेले सुष्मिताचे नाव

- Advertisement -

सुष्मिता सेनचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत जोडले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी सुष्मिता ललित मोदीसोबतचा नात्यामुळे चर्चेत आली होती. मात्र, काही महिन्यातच त्यांचा ब्रेकअप झाला. सुष्मिताला अनेकदा एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत स्पॉट केलं जातं.

 


हेही वाचा : सनी देओलच्या ‘गदर 2’चे प्रियंका-निकने केले कौतुक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -