सुष्मिताचं नेटकऱ्यांना प्रत्युत्तर; बॉलिवूड कलाकारांनी केलं सुष्मिताचं समर्थन

सुष्मिता सेन स्वताःच्या एका फोटोची नवीन पोस्ट आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. सुष्मिता सेनच्या या पोस्टवर बॉलिवू़ड कलाकार कमेंट्स करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी त्यांच्या नात्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. मात्र, आता हळूहळ त्यांच्या नाच्याबद्दल बॉलिवूडमध्ये देखील चर्चा होत आहे. सुष्मिता आणि ललितच्या नात्यावर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुष्मिता सेन स्वताःच्या एका फोटोची नवीन पोस्ट आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. सुष्मिता सेनच्या या पोस्टवर बॉलिवू़ड कलाकार कमेंट्स करत आहेत.

सुष्मिता सेनचं ट्रोलर्सना उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

खरंतर मागील काही दिवसांपासून ट्रोलर्स सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या नात्यावर अनेक टीका करत आहेत. तसेच काहीजणांच्या मते, पैश्यांसाठी सुष्मिता सेन ललित मोदीसोबत नात्यात आली आहे. यामुळेच अनेकजण सुष्मिताला गोल्ड डिगर म्हणून सुद्धा ट्रोल करत आहेत. या सर्व ट्रोलर्सना सणसणीत उत्तर देत सुष्मिता सेनने एक सुंदर पोस्ट शेअर करत एक भलं मोठ्ठ कॅप्शन दिलं आहे. त्यात तिने लिहिलंय की, “माझे अस्तित्व आणि माझा अंतरात्मामध्ये पूर्णपणे लीन होऊन मी प्रेम करते. प्रकृती आपल्या सर्व गोष्टी एकत्र जोडून ठेवते. मात्र, आपण माणसं हा समतोल तोडून टाकतो. मला आपल्या आसपासच्या दुनियेला दुःखी पाहून माझं मन पिळवटून जातं. मी माझे समर्थन करणाऱ्या लोकांवर नेहमीच प्रेम करत राहीन, त्यांना मी तुम्हाला सांगू इच्छिते की, तुमची सुष एकदम ठीक आहे. मी तो सूर्य आहे ज्याचा प्रकाश आजही तेजस्वी आहे.”

सुष्मिताच्या कॅप्शनवर बॉलिवूड कलाकारांचं समर्थन
सुष्मिता सेनच्या या पोस्टवर बॉलिवूड कलाकारांनी समर्थन केले आहे. प्रियांका चोपडाने यावर लिहिलं की, हिला राणी म्हणा! तर सुनील शेट्टीने टाळ्या वाजणारी इमोजी पाठवलेली आहे. तसेच रणवीर सिंहने हार्ट इमोजी पाठवलेली आहे.या प्रकारे अनेक कलाकारांनी सुष्मिता सेनला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, गुरूवारी ललित मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुष्मिता सोबतचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. त्यावेळी प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला होता. त्यावेळी अनेकजण दोघांनी लग्न केलं असंही म्हणत होते. मात्र, त्याचवेळी आणखी एक पोस्ट करत ललित मोदी यांनी आम्ही फक्त एकमेकांना डेट करत आहोत हे स्पष्ट केलं होतं.


हेही वाचा :समंथा रूथ प्रभू सोशल मीडियापासून दूर? चाहते पडले चिंतेत