माझ्या बाबांच्या टीमवर संशय …केकेच्या मुलीने शेअर केली भावनिक पोस्ट

या पोस्टमध्ये तामराने केके आणि त्याच्या संपूर्ण टीमचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोंसोबत तामराने एक भलं मोठं कॅप्शन सुद्धा लिहिलेलं आहे

सुप्रसिद्ध गायक केके याचे ३१ मे रोजी रात्री कोलकत्ता येथे झालेल्या एका म्यूजिक कॉन्सर्टनंतर अचानक केकेचा मृत्यू झाला. केकेच्या अचानक जाण्याने बॉलिवूड सहीत त्याच्या कुटुंबियांमध्ये आणि चाहत्यांमध्ये देखील शोककळा पसरली. केकेच्या पोस्टमॉर्टम दरम्यान त्याचा मृत्यू कार्डिएक अरेस्टमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र केकेच्या मृत्यू हा संशयास्पद वाटत असल्याने त्यावर आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

तसेच आता केकेच्या टीमवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केकेचे मॅनेजर हितेश भट आणि शुभम भट यांच्या विरोधातही आता सोशल मीडियावर अनेक टिका होऊ लागल्या आहेत. याच दरम्यान केकेची मुलगी तामरा हिने एक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत केकेच्या चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे.

या पोस्टमध्ये तामराने केके आणि त्याच्या संपूर्ण टीमचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोंसोबत तामराने एक भलं मोठं कॅप्शन सुद्धा लिहिलेलं आहे. त्यात तीने म्हटलं की, केकेच्या टीम विरोधात चूकीच्या नकारात्मक गोष्टी पसरवणं बंद करा आणि त्यांना सपोर्ट करा. तामराने असे भावनिक आवाहन केले आहे.

तामराचा केकेच्या टीमला पाठिंबा

 

View this post on Instagram

 

A post shared by Taamara (@taamara.k24)

तसेच तिने लिहिलंय की,“मी या फोटोमधील प्रत्येक व्यक्तीची खूप आभारी आहे कारण यातील प्रत्येक व्यक्ती माझ्या बाबांसोबत कायम होती. माझ्या बाबांचे शो प्रत्येकाच्या आठवणीत राहतील असे होण्यासाठी यांनी मेहनत घेतली. मी हितेशला सांगितलं की, जेव्हा बाबा गेले तेव्हा मी, आई किंवा नकुल कोणीच त्यांच्यासोबत नव्हतो. त्यांना आणि अखेरचं गुड बाय देखील म्हणू शकलो नाही. पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही नेहमीच त्यांच्या सोबत होता. जेव्हा बाबांनी काम करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही त्यांना साथ दिली.”

तसेच तामराने पुढे लिहिलंय की,”बाबांचे त्यांच्या टीममधील प्रत्येक व्यक्तीवर खूप प्रेम होते. बाबांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. मला समजंल की, हितेश आणि शुभम यांच्या वर बाबांच्या मृत्यूनंतर अनेक टिका करण्यात आल्या, धमक्यांचे फोन आणि मेसेज सुद्धा आले. तुम्ही प्लिज चूकीच्या कोणत्याही अफवा पसरवू नका”.

 


हेही वाचा :“हा तर वडापाव सारखा”……अल्लू अर्जुनचं वाढलेले वजन पाहून युजर्सने केलं ट्रोल