लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापासूनच या सिनेमाच्या कमाईचा वेग उत्तम राहिलाय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या सिनेमाचे हाऊसफुल्ल शो पहायला मिळाले. यातील अभिनयासाठी विकी कौशल (छत्रपती संभाजी महाराज), रश्मिका मंदाना (महाराणी येसूबाई), अक्षय खन्ना (मुघल सम्राट औरंगजेब), विनीत कुमार सिंह (कवी कलश) या कलाकारांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले गेले. अनेक मराठी कलाकारांनीसुद्धा यात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यांपैकी सुव्रतच्या पत्नीने अर्थात सखी गोखलेने हा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर एक पोस्ट शेअर केली होती. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
‘छावा’मध्ये अनेक मराठी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये अभिनेता सुव्रत जोशीचा समावेश आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचं सैन्य कैद करतानाचा सीन दाखवण्यात आला आहे. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला? अशी शंका संताजींच्या मनात येते आणि यातून फितुरी झाल्याचं समजतं. गणोजी, कान्होजी मुघलांना सामील झाल्यामुळे शंभुराजांना कैद झाली होती आणि सिनेमात यांच्या भूमिका अनुक्रमे सारंग साठ्ये व सुव्रत जोशी यांनी साकारल्या आहेत. ‘छावा’च्या रिलीजदरम्यान सुव्रत परदेशात होता. पण भारतात परतल्यावर त्याने पत्नी सखी गोखलेबरोबर सिनेमा पाहिला. ज्यानंतर सखीने सुव्रतसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री सखी गोखलेने ही पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, ‘सिनेमात तुमचं काम एवढं व्यवस्थित करा की तुमची बायको द्विधा मनस्थितीत पडायला हवी… तू इतकं छान काम केलं आहेस म्हणून तुझं कौतुक करू की तुझी भूमिका पाहून तुझा द्वेष करू? या विचारात मी पडलेय… सुव्रत मला तुझा कलाकार म्हणून खूप खूप अभिमान वाटतो’. या पोस्टसोबत सखीने ‘छावा’मध्ये सुव्रतने साकारलेल्या व्यक्तिरेखेचा फोटो शेअर केला आहे. ज्यातील कान पकडलेला सुव्रतचा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेही पहा –