घरमनोरंजन...यामुळे चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी खूपच झाला हळवा

…यामुळे चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी खूपच झाला हळवा

Subscribe

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी भावूक झाला आहे.

आपण अनेक चॅट शो पाहिले आहेत ज्यात कलाकार मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतात. अशा कार्यक्रमांमधून कलाकारांचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर येतात. झी मराठीने नुकताच प्रेक्षकांसाठी सादर केलेला अळीमिळी गुपचिळी हा चॅट शो ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अभिनेता अतुल परचुरे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेत. अभिनेत्री स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील अतुलला उत्तम साथ देत आहेत.

swapnil joshi enjoyed with daughter in alimili gupchili programme

- Advertisement -

मात्र, या आठवड्यात अळीमिळी गुपचिळीच्या मंचावर महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी येणार आहे. स्वप्नील जोशी त्याच्या मुलांसोबतचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असतो, पण अळीमिळी गुपचिळीच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील आणि त्याच्या दोन्ही मुलांना एकत्र धमाल करताना पाहायला मिळेल. या मंचावर येऊन स्वप्नील आणि मायराने एकत्र मिळून ‘मायरा तुझा बाबीवर भरवसा नाय काय?’ हे गाणं देखील गायलं. स्वप्नीलला गाण्यात मायराने साथ दिली. तसेच त्याच्या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर स्वप्नील खूपच हळवा झाला असल्याचं त्याने या मंचावर सांगितलं. स्वप्नील, मायरा आणि राघव अळीमिळी गुपचिळीच्या मंचावर काय धमाल करतात हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.


हेही वाचा – Video: Coronavirus करोनामुळे सोनमने सासूशी साधला खिडकीतून संवाद!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -