HomeमनोरंजनSwapnil Joshi : स्वप्नीलने नववर्षाची केली भक्तिमय सुरुवात

Swapnil Joshi : स्वप्नीलने नववर्षाची केली भक्तिमय सुरुवात

Subscribe

स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने हिन्दी आणि मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. स्वप्नील जोशीला चॉकलेट बॉय म्हणूनही ओळखले जाते. त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता स्वप्नील जोशी कायम चर्चेत असलेला अभिनेता आहे आणि तो कायम वैविध्यपूर्ण काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. 2025 हे वर्ष स्वप्नील साठी महत्त्वपूर्ण आहे आणि याला खूप कारण देखील आहेत.

स्वप्नील ने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन 2025 वर्षाची भक्तिमय सुरुवात केली आहे. वर्षाची एवढी सुंदर सुरुवात करून त्याने त्याचा 2025 मध्ये कामाला सुरुवात केली आहे.

2025 मध्ये स्वप्नीलचे अभिनेता आणि निर्माता म्हणून अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या महिन्यात 17 जानेवारीला ” जिलबी ” नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुढे स्वप्नील त्याची निर्मिती आणि अभिनय असलेला ” सुशीला – सुजीत ” साठी सज्ज होत आहे तर वर्ष संपताना स्वप्नील ने अजून एका चित्रपटाची घोषणा केली चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नीलच्या कामाची यादी इथेच थांबत नाही तर तो या वर्षात गुजराती सिनेमात देखील झळकणार आहे.

एकंदरीत काय नवीन वर्ष स्वप्नील साठी चित्रपटमय ठरणार आहे !

Edited By : Prachi Manjrekar


हेही वाचा : Siddharth Chandekar : सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र