Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन स्वरा भास्कर आणि फहाद अहमदच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्वरा भास्कर आणि फहाद अहमदच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची घोषणा केली. स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेजे केलं. आता ती पुन्हा एकदा कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थित धुमधडाक्यात लग्न करणार आहे. अशातच रविवारी स्वराने तिच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या आणि फहादच्या चेहऱ्यावर हळदीव्यतिरिक्त इतर रंग देखील लावलेले दिसत आहेत.

स्वराने शेअर केले फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराने तिच्या हळदीचे फोटो शेअर करत लिहिलंय की, “आयुष्यातील सर्व रंग साजरे करण्यासाठी #SwaadAnusaar”. या फोटोंमध्ये स्वराने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि जयपुरी स्टाईलची ओढणी घेतली आहे. तर फहादने देखील पांढरा कुर्ता परिधान केला आहे. स्वराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.स्वरा आणि फहादचे हे फोटो पाहून अनेकजण या जोडीला शुभेच्छा देत आहेत.

कोण आहे फहाद अहमद?

- Advertisement -

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी फहाद जिरार अहमदसोबत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.


हेही वाचा :

‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळताच बॉलिवूडकडून कौतुकाचा वर्षाव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -