सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला ३ महिने उलटून गेले आहेत. सुशांत तपासादरम्यान बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरील सर्व लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रीत झाले आहे. काल या ड्रग्जप्रकरणी बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा सुशांतचे नाव समोर आले. सुशांत व्हॅनिटी व्हॅनमध्ये आणि शूटिंगच्या ब्रेकमध्ये ड्रग्ज घ्यायचा याबाबत सारा आणि श्रद्धाने खुलासा केला आहे. पण यावर अभिनेत्री स्वरा भास्कर आणि सुशांतचा मित्र युवराज सिंह संतापले.
काय म्हणाली स्वरा भास्कर?
स्वराने एक न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे की, ‘खुश? #justiceforSushanthSinghRajput ब्रिगेड, बस या अभी और भद्द पिटवानी है बेचरे सुशांत की?, असा सवाल तिने ट्विटमध्ये केला आहे.
ख़ुश? #justiceforSushanthSinghRajput brigade 👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽 बस या अभी और भद्द पिटवानी है बेचारे सुशांत की??? #shamelessscavengers https://t.co/p5du5dmMVd
— Swara Bhasker (@ReallySwara) September 26, 2020
सुशांत मित्र युवराज म्हणाला की,….
‘सुशांतवर सारा आणि श्रद्धा ड्रग्ज घेण्याचा आरोप करीत आहेत, जसे की त्यांनी काहीच चूक केली नाही?’, असे युवराज टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाला. तसेच जेव्हा त्याला विचारले की, सारा आणि श्रद्धा या दोघी असे का करत आहेत? त्यावेळेस युवराजने उत्तर दिले की, ‘त्या दोघींनाही एनडीपीएस कायद्याचे गांभीर्य माहिती आहे म्हणून.’
शनिवारी झालेल्या चौकशीमध्ये सारा आणि श्रद्धाने सुशांत ड्रग्ज घेत असल्याचा खुलासा केल्यामुळे या प्रकरणातील नायक आता खलनायक झाला आहे. दरम्यान या चौकशीसाठी एनसीबीने दीपिका, सारा आणि रकुल प्रीत सिंह या तिघींचा मोबाईल जप्त केला आहे. आता या मोबाईल फोनमधून या प्रकरणासंबंधित काही सुगावा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच आधारावर या अभिनेत्रींवर काय कारवाई केली जावी हे देखील निश्चित केले जाणार आहे.
हेही वाचा – NCB च्या प्रश्नांच्या भडीमारानंतर दीपिका ढसाढसा रडली