घरमनोरंजन'वीरे दी वेडिंग'मधील 'या' सीनमुळे होत आहे स्वरा भास्कर ट्रोल!

‘वीरे दी वेडिंग’मधील ‘या’ सीनमुळे होत आहे स्वरा भास्कर ट्रोल!

Subscribe

करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्करच्या ‘वीरे दी वेडिंग’ ने आतापर्यंत २२ कोटींची कमाई केली आहे. मात्र सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती स्वराने केलेल्या सीनची. ज्यासाठी स्वरा भास्करला ट्रोल करण्यात येत आहे. शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट ४ मैत्रिणींच्या आयुष्यावर आधारित असून या चारही जणी आधुनिक विचाराच्या आणि स्वतःच्या पद्धतीने आयुष्य जगणाऱ्या आहेत.

का ट्रोल होत आहे स्वरा?
चित्रपटामध्ये स्वराला एका सीनमध्ये मास्टरबेशन करताना दाखवण्यात आलं आहे. ‘चरम सुख’ प्राप्तीसाठी स्वरा या सीनमध्ये वायब्रेटरचा वापर करते असं दाखवण्यात आलं आहे. यावरूनच तिला सध्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. स्वरा बऱ्याचदा तिच्या बोलण्यावरून अथवा तिच्या भूमिकेवरून ट्रोल होते. मात्र तिने इंडस्ट्रीमध्ये अभिनयाने स्वतःचे असे एक स्थान निर्माण केलं आहे.

- Advertisement -

युजर्सने यासाठी केलं ट्रोल…
एका युजरने स्वराला ट्रोल करून म्हटलं की, ‘मी माझ्या आजीबरोबर चित्रपट पाहत असताना हा सीन आल्यानंतर मलाच लाज वाटली.’ बरेच ट्विट आजीबरोबर चित्रपट पाहिल्यानंतरचा अनुभव असल्याचेच सांगत आहेत. पण दुसऱ्या बाजूला स्वराचे फॉलोअर्स तिची बाजू घेत आहेत. ‘इतके संस्कारी लोक असा चित्रपट आपल्या आजीबरोबर का बघत आहेत?’ असा प्रश्नदेखील काहींनी उपस्थित केला आहे. एका युजरने म्हटलं आहे, ‘पेड ट्रोल करत असाल तर निदान वाक्य तरी बदला.’ त्यावर स्वराने ‘पेड पोस्टचा पोलखोल झाला’ असं ट्विट केलं आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -