Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन स्वरा भास्करचे मॅटरनिटी फोटोशूट पाहिलतं का?

स्वरा भास्करचे मॅटरनिटी फोटोशूट पाहिलतं का?

Subscribe

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फदह अहमद यांच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. स्वरा आणि फदह यांनी 16 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. त्याच्या काही महिन्यांनी स्वराने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा करत सर्वांना हैराण केले होते. अशातच नुकतेच स्वराने आपल्या सोशल मीडियात तिच्या मॅटरनिटीचे फोटोशूट केले आहे.

स्वरा भास्करने इमोशनल पोस्ट शेअर करत म्हटले की, कधी-कधी आयुष्य तुम्हाला बहुतांश गोष्टी देते. आयुष्याच्या प्रवासात तुम्ही स्वत:ला शोध घेण्यासाठी आणि एकमेकांना साथ देण्याची संधी मिळते. आपल्या आयुष्यात या खास क्षणाला बरखा अग्रवाल हिने कॅमेऱ्यात कैद केले आहे. पोस्टमध्ये स्वराने असे ही म्हटले की, तिचा नवरा फहाद हा मॅटरनिटी शूटसाठी लाजत होता. तिने म्हटले करायचे नव्हते तरीही त्याने एका सपोर्टिंग मॉडल प्रमाणे माझी साथ दिली त्यासाठी आभार.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

- Advertisement -

स्वरा भास्करने 6 जूनला सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीबद्दल गुडन्यूज दिली होती. पती फहाद सोबत फोटो शेअर करत तिने अत्यंत इमोशनल पोस्ट ही शेअर केली होती.

- Advertisement -

कोण आहे फहाद जिरार?
स्वरा भास्करने फहाद जिरार अहमदसोबत फेब्रुवारी पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.


हेही वाचा- स्वरा भास्करने केली बाळाच्या आगमनाची तयारी; फोटो व्हायरल

- Advertisment -