स्वरा भास्करच्या एका पोस्टने केली टीकाकारांची ‘बोलती बंद’

स्वरा भास्करने राजकारणी फहाद अहमदसोबत १६ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. लग्न झाल्यापासून ही अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अनेक नेत्याकऱ्यांकडून या अभिनेत्रीला खूप काही बोलण्यात आले आहे. पण आता स्वरा भास्करने द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. स्वराने याबाबत एक ट्विट केले आहे.

Swara Bhaskar's posts has left critics speechless

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारी या दिवशी राजकारणी फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली. याबाबतची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिली. तिच्या चाहत्यांनी तिला तिच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. पण सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी मात्र तिच्यावर सडकून टीका केली. स्वराने एका मुस्लिम तरुणाशी लग्न केल्याने तिला टीकेचा सामना करावा लागला. तर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी तर तिला दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण करून दिली. पण तिच्या लग्नावर टीका करणाऱ्यांना स्वराने एक ट्वीट करत उत्तर दिले आहे.

स्वरा भास्कर ही ट्रोल होत असताना देखील शांत का आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता स्वराने सुद्धा टीका करणाऱ्यांना शांत भाषेत उत्तर दिले आहे. स्वराने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिने तिचा पती फहाद अहमदसोबतचे कोर्टात लग्न केल्याचे काही फोटो ट्विटरला शेअर केले आहेत. यामध्ये तिने लिहिले आहे की, “हेटर्स : सूटकेस, फ्रिज, बेकायदेशीर, धर्मांतर ब्ला…. ब्ला… आम्ही दोघे.”

स्वरा भास्करने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आणि फहाद खूप आनंदी दिसत आहेत. या जोडप्याच्या लग्नात मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असल्याचे दिसून येत आहे. स्वरा आणि फहाद अहमद यांनी कोर्टात केलेल्या लग्नाचे हे फोटो आहेत. फोटोमध्ये कपल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. फहादची आई इरा स्वराला मिठी मारताना दिसत आहे. फहाद आणि स्वरा यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

हेही वाचा – “नामांतराचा निर्णय घेताना गद्दार तिथे नव्हते”; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल

चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्कर बरेलीची सून झाली आहे. तिचा नवरा फहाद अहमद हा बरेलीच्या बहेडी येथील रहिवासी आहे. दोघांचेही नुकतेच लग्न झाले, पण हे लग्न कायदेशीर करण्यासाठी 16 मार्च रोजी दिल्लीतील साकेत येथील हॉटेलमध्ये सार्वजनिक विवाह सोहळा पार पडणार आहे. 19 मार्च रोजी बहेडी येथील फहादच्या वडिलोपार्जित निवासस्थानी दावत-ए-वलीमा (स्वागत) कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. फहाद अहमद हा बहेडी येथील इस्लाम नगर परिसरात राहतो. काँग्रेस नेते आणि समाजसेवक जरार अहमद यांचा तो मुलगा आहे.