घरमनोरंजन‘आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’; मोगरा फुलला

‘आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’; मोगरा फुलला

Subscribe

‘आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’ या सुंदर कऍप्शन खाली मोगरा फुलला या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सुंदर वाक्यामुळे आई आणि मुलामधील मायेचे जिव्हाळ्याचे नातं अधोरेखित होत आहे.

श्रावणी देवधर दिग्दर्शित, अभिनेता स्वप्निल जोशी याची मुख्य भुमिका असणारा ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमधून चित्रपटातील आणखी एक व्यक्तिरेखा समोर आली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Mogra Phulaala- Poster (Neena Kulkarni and Swapnil Joshi)-1
मोगरा फुलला पोस्टर

काय आहे पोस्टरमध्ये

- Advertisement -

नव्याने प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्वप्नील जोशीने आपल्या आईच्या म्हणजेच नीना कुलकर्णी यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आहे. ‘आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’ या सुंदर कऍप्शन खाली हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सुंदर वाक्यामुळे आई आणि मुलामधील मायेचे जिव्हाळ्याचे नातं अधोरेखित होत आहे.

“मी सेटवर काम करत असताना खुश होते कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. स्वप्नील जोशीबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं, चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे ह्यांच्या बरोबर पुन्हा काम करायला मजा आली. ‘मोगरा फुलाला’ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं. या चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांचादेखील विशेष उल्लेख करेन. त्यांचे विशेष आभार.”- नीना कुलकर्णी, अभिनेत्री

- Advertisement -

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -