घरमनोरंजन'पुष्पक विमान': आजोबा नातवाची हळवी गोष्ट

‘पुष्पक विमान’: आजोबा नातवाची हळवी गोष्ट

Subscribe

भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी कथा म्हणजेच 'पुष्पक विमान' चित्रपट. यामध्ये आजोबा-नातवाच्या नात्याची गोष्ट मांडण्यात आली आहे.

आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. आयुष्यात नातू असला की अजोबांना दुसऱ्या दोस्तांची गरजच नसते. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट ‘पुष्पक विमान’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे.

चित्रपटाची कथा थोडक्यात

चित्रपटाची कथा आहे विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची. तात्या जळगावमध्ये राहणारं वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती यामध्ये आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन ही कथा नेहमीच भुरळ घालत असते. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहून भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून ‘तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास’ आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी ही घटना कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या इरसाल पण निरागस विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक कथा म्हणजेच ‘पुष्पक विमान’.

- Advertisement -

पुष्पक विमानातले कलाकार प्रवासी

चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे हे प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याचबरोबर गायक राहुल देशपांडे एका खास भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Pushpak viman
पुष्पक विमान सिनेमाची टीम (सौजन्य-इन्स्टाग्राम)

पडद्यामागची तगडी टीम

मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे असून, कथा सुबोध भावे यांची आहे. पटकथा व  दिग्दर्शन वैभव रा. चिंचाळकर यांचे आहे. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणिनकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्मात्याची धुरा रत्नकांत जगताप यांनी सांभाळली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -