‘ब्लर’च्या सेटवर तापसी पन्नू डोळ्यांवर पट्टी बांधून,काय आहे कारण?

. सकाळी ७ वाजल्यापासून तिने तिच्या डोळ्यांवर कपड्याची पट्टी बांधली आणि दिवसभरातील सर्व कामे पार पाडलीत

Taapsee Pannu blindfolded on set of 'Blur' movie due to understand her character feelings
'ब्लर'च्या सेटवर तापसी पन्नू डोळ्यांवर पट्टी बांधून,काय आहे कारण?

नॅशनल आयकॉन आणि अष्टपैलू प्रतिभा असलेली तापसी पन्नू तिच्या बॅक टू बॅक हिट्सने चर्चेत आहे. रश्मी रॉकेटमधील तिच्या अभिनयाने चाहत्यांचे प्रेम मिळवल्यानंतर, तापसीचा आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर ‘ब्लर’कडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू असून ब्लरमधील तिचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे.

तापसीने तिच्या व्यक्तिरेखेच्या अभ्यासासाठी १२ तास डोळ्यांवर पट्टी बांधली आणि सेटवरील सर्वांनी तिची प्रशंसा केली. सूत्रांनी खुलासा केला की, “तापसीने तिच्या व्यक्तिरेखेच्या भावना समजून घेण्यासाठी तिने १२ तास डोळ्यांवर पट्टी बांधून राहण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजल्यापासून तिने तिच्या डोळ्यांवर कपड्याची पट्टी बांधली आणि दिवसभरातील सर्व कामे पार पाडलीत. डोळ्यावर पट्टी बांधूनच फोन कॉल्सला उत्तर देणे, खाणे, क्रू, कलाकार आणि चित्रपटाच्या टीमशी बोलणे असे सर्व तिने केले.”

आजच्या पिढीची खरी नायिका म्हणून स्वतःला यशस्वीपणे स्थापित करणारी तापसी ही युवा अभिनेत्री आहे. तापसी पन्नूला आणखी एका अनुकरणीय ऑन-स्क्रीन कामगिरीमध्ये पुनरागमन करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्यापासूनच या रंजक कथेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ब्लरला मनोरंजक सामाजिक संदर्भासह पॉवर-पॅक केलेले मनोरंजन म्हणून ओळखले जात आहे.

अजय बहल दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज, आउटसाइडर्स फिल्म्स आणि इकेलॉन प्रॉडक्शन यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला ‘ब्लर’ हा आगामी हिंदी थ्रिलर पट आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहेत.


हेही वाचा – Ankita Lokhande : ‘मैं ससुराल नही जाऊंगी’ गाण्यावर अंकिताने धरला बॅचलर पार्टीत ठेका