Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन मुनमुन दत्ताने मोनोकनीमध्ये घेतला मड बाथ; चाहते म्हणाले...

मुनमुन दत्ताने मोनोकनीमध्ये घेतला मड बाथ; चाहते म्हणाले…

Related Story

- Advertisement -

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रत्येक घरा-घरातील पाहिली जाते. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा असून या मालिकेत बबीता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर बर्‍याचदा चर्चेत असते. मुनमुनने तिचे लेटेस्ट फोटो आपल्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जी व्हायरल होताना दिसत आहेत. नुकतेच तिने थ्रोबॅकचे तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मुनमुन दत्ताच्या जॉर्डनच्या सुट्टीतील आहेत, जिथे ती २०१७ मध्ये गेली असल्याचे समजतेय. या सुट्टीच्या दिवशी मुनमुन दत्ताने समुद्र किना-यावर मड बाथ घेतला. मड बाथचे हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये मुनमुन चिखलात भिजलेली आणि मोनोकनीमध्ये दिसतेय.

चिखलाने माखलेल्या अवस्थेत समुद्राजवळ ती उभी असल्याचे या फोटोमध्ये दिसते. मुनमुन दत्ताच्या फोटोवरून हे स्पष्ट होते की तिने तिचा वेळ चांगलाच उपभोगला आहे. मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबीता या नावाची भूमिका साकारते. बबीताजी आणि जेठालाल यांची जोडी मालिकेत चांगलीच विनोदी भूमिका साकारता दिसतात. हे फोटो सोशल मीडियावर शेअर नंतर तिला नेटकऱ्यांसह चाहत्यांच्या चांगल्याच कंमेंट आल्यात. यावेळी एका चाहत्याने जेठालालसाठी इतके काही करत आहात, अशा आशयाची कंमेंट केल्याचे पाहायला मिळाले. तसेच, काहींनी हार्ट इमोजीद्वारे व्यक्त होत मुनमुनची ही शैली आवडली असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

मुनमुन दत्ता २०१७ मध्ये जॉर्डनमध्ये सुट्टीसाठी गेले होती. त्यावेळी तिने आपल्या वेळेचा खूप आनंद लुटला. आता तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून आठवणींना उजाळा दिल्याचे दिसतेय. अलीकडेच मुनमुन दत्ताने लिंक्डइनवर तिच्या बनावट खात्याबद्दल चाहत्यांना सतर्क केले. कोणीतरी तिच्या नावाने अकाउंट तयार करून फसवणूक करत असल्याचे तिने सांगितले होते. अशा परिस्थितीत चाहत्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहनही तिने केले. यासह मुनमुन दत्ताही कायम वादात असते. गेल्या महिन्यात तिच्या एका व्हिडिओमुळे ती ट्रोल झाली होती आणि तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. यानंतर हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले. या वादानंतर मुनमुन दत्ताने व्हिडिओ काढून टाकला होता तसेच युजर्सने त्यांच्या चुकीबद्दल क्षमा मागितली होती.


ENG vs PAK : लिविंगस्टनचे झुंजार शतक वाया; पहिल्या टी-२० सामन्यात पाकची इंग्लंडवर मात
- Advertisement -