तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचे सावट

तारक मेहताच्या कलाकारांमध्ये चिंतेचे वातावरण

taarak mehta ka ooltah chashmah Actor mayur vakani & mandar chandwadkar become corona positive
तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचे सावट

कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर थैमान सुरु आहे. त्यातच आता सोनी मराठी वाहिनीवरील तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही मालिका सर्वत्र लोकप्रिय असून यातील दयाबेनच्या भावाची म्हणजेच सुंदरची भूमिका साकारणारा अभिनेता मयुर वकाणी याला कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी समजले. त्यातच आता आणखी कलाकारांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तारक मेहता का उल्टा चष्मा मधील कलाकारांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे. यापाठोपाठचं गोकुलधाम सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरी भिडेची भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर याला कोरोनाची लागण झाली आहे. मंदार चांदवडकरला आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याने स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. त्याच्यासोबत त्याने घरच्यांना देखीन क्वारंटाइन केले आहे. बीएमसीने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन केले जात आहे. त्याच्यावर घरीच उपचार केले जात असून सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे, असे मंदार चांदवडकर याने सांगितले आहे. तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचे सावट आले असून, या मालिकेतील इतर कलाकारांनीसुद्धा कोरोनाची लस घेतली आहे.

तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दयाबेनचा भाऊ सुंदर मालिकेत खुप कमी वेळा दिसतो. मात्र कमी प्रसंगातूनही त्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान मिळवले आहे. मयुर मालिकेच्या चित्रीकरणानंतर अहमदाबादला त्याच्या घरी गेला होता. तिथे त्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली असून त्याने कोरोना टेस्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या पत्नीलासुद्धा कोरोनाचे संक्रमण झाले. कोरोनाने बॉलीवुडसह आता टिव्ही मालिकेतील कलाकारांनासुद्धा विळखा घातला आहे.


हेही वाचा – हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्या मुंब्रा रेतीबंदरात सापडला अजून एक मृतदेह