घरमनोरंजन'तारक मेहता' मालिकेतील नट्टू काकांच्या भूमिकेसाठी नवा चेहरा! फोटो व्हायरल

‘तारक मेहता’ मालिकेतील नट्टू काकांच्या भूमिकेसाठी नवा चेहरा! फोटो व्हायरल

Subscribe

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यामुळे आज जगभरात मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांच्या निधनामुळे हे पात्र गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नव्हते. दरम्यान आता नवीन नट्ट काका मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मात्र ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे? अशातच सोशल मीडियावर एक फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे मालिकेत नवीन नट्टू काका येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो व्हायरल होताच निर्मात्यांनी नट्टू काका यांच्या भूमिकेसाठी एका नवीन कलाकाराला घेतल्याचे म्हटले जातं आहे.

- Advertisement -

इन्स्टाग्रामवर तारक मेहता या मालिकेचे अपडेट देणाऱ्या एका फॅनपेजने नव्या नट्टू काकांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात हा नवीन अभिनेता जेठालालच्या दुकानात त्याच खुर्चीवर बसला आहे जिथे घनश्याम बसायचे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणार हा फोटो खरा आहे की खोटा हे सांगता येणार नाही. ऑक्टोबर महिन्यात नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. ते २००८ पासून मालिकेशी जुळलेले होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. परंतु नट्टू काका यांची मालिकेतील जागा आता कोण भरुन काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले. या मालिकेतील दयाबेन आणि जेठालाल, तारक मेहता आणि जेठालाल, भिडे आणि माधवी बेहन आणि जेठालाल आणि नट्टू यांच्या जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.


आदिवासींच्या व्यथा, त्यांच्यावरील अन्याय दिसला नाही फक्त… ‘जय भीम’ सिनेमाच्या वादावर प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -