घरमनोरंजन'तारे जमीन पर'चं दिग्दर्शन आमीर खान ने नाही मी केलं...अमोल गुप्ते

‘तारे जमीन पर’चं दिग्दर्शन आमीर खान ने नाही मी केलं…अमोल गुप्ते

Subscribe

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट तारे जमिन पर या चित्रपटाचं दिग्दर्शन आमिर खान ने नाही तर मी केल आहे अस खळबळजनक वक्तव्य २००७ साली अमोल गुप्ते यांनी केल होत. आता परत एकदा अमोल गुप्ते यांनी यावर भाष्य केल आहे.

दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचा सायना हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखती मध्ये अमोल गुप्ते आणि आमिर खान यांच्यामधील जुना वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट तारे जमिन पर या चित्रपटाचं दिग्दर्शन आमिर खान ने नाही तर मी केल आहे अस खळबळजनक वक्तव्य २००७ साली अमोल गुप्ते यांनी केल होत. आता परत एकदा अमोल गुप्ते यांनी यावर भाष्य केल आहे.

आमिर खान ने शेवटच्या क्षणी मला चित्रपटातून बाहेर केल तसेच पुढील चित्रपट त्याने दिग्दर्शित करण्यास सुरवात केली असा आरोप तारे जमिन पर या चित्रपटाच्या रिलीज दरम्यान २००७ साली अमोल गुप्ते यांनी केल. ”या घटनेला आता बराच काळ लोटला आहे आणि त्याचा मला आता काहीच फरक पडत नाही.भूतकाळात जगत राहणाऱ्यांपैंकि मी नाही जो सतत दु:खाचे कढ उकळत बसेल. सूर्यास्तानंतर नेहमी सूर्योदय होतो.आलेला प्रत्येक दिवस मी बैलासारखा शिंगावर घेण्यावर मी विश्वास ठेवतो आणि नवीन दिवस आपल्यासाठी काय घेऊन आला आहे हे पाहतो.१४ वर्षे आपली कला जोपासत चित्रपटसृष्टीत टिकून राहण्याचे एकमेव कारण आहे.”असं अमोल गुप्ते मुलाखती दरम्यान म्हणाले.

- Advertisement -


२००७ साली आलेला चित्रपट तारे जमीन पर या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली सोबतच अनेक पुरस्कार या चित्रपटाच्या पदरात पडले.चित्रपटात मांडण्यात आलेल्या विषयामुळे प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते.तारे जमीन पर या चित्रपटाच्या दिग्दर्शिनाची धूरा आधी अमोल गुप्ते सांभाळणार होते त्यांनीच चित्रपटाच लेखन केल होत तसेच चित्रपटातील मुख्य पात्र दर्शील सफारी चा शोध ही त्यांनीच केला होता.पण अनेक कारणांमुळे आमिर आणि अमोल मध्ये वाद होऊ लागल्याने अमोल गुप्ते यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.


हे ही वाचा- नेपोटीझमचा आरोप टाळण्यासाठी करण जोहरने लढवली नवी शक्कल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -