फेब्रुवारी महिना सुरू झाला की सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागतात. अर्थात या महिन्यात ‘व्हॅलेंटाईन्स डे’ असल्यामुळे वातावरण गुलाबी असतं. कुणी आपल्या प्रियकर- प्रेयसीसोबत तर कुणी आपल्या पती- पत्नीसोबत हा दिवस साजरा करतात. एकंदरच काय तर या दिवसाचं प्रत्येकाला आकर्षण आहे. असे असताना बॉलिवूड सिनेविश्वातील एक अभिनेत्री अजूनही सिंगल आहे. त्यामुळे यंदाही तिचा व्हॅलेंटाईन्स एकटेपणातचं जाणार. चला तर ही अभिनेत्री कोण आहे याविषयी जाणून घेऊया. (Tabu is single at the age of 54 know the reason)
तबस्सुम फातिमा हाश्मी अर्थात बॉलिवूड सिनेविश्वाची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री तब्बू. तिच्याविषयी सांगावं, बोलावं असं फार काही आहे. पण तरीही लोकांना कायम तिच्या सिंगल राहण्याविषयी प्रश्न पडतात. वयाची पन्नाशी ओलांडूनही इतकी सुंदर अभिनेत्री अविवाहित का? असे अनेकदा विचारले जाते.
View this post on Instagram
एक कुशल अभिनेत्री म्हणून तिने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. पण गेल्या काही काळात तिचा सिनेइंडस्ट्रीतला वावर बराच कमी झाला आहे. असे असले तरीही खाजगी आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या तब्बूविषयी आज आपण काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
वयाच्या 14 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण
यशस्वी अभिनेत्रींमध्ये तब्बूचे नाव घेतले जाते. पण फार कमी लोक हे जाणतात की, तिने वयाच्या 14व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. माहितीनुसार, तब्बूचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा देव आनंद यांच्या ‘हम नौजवान’ या सिनेमातून सुरू झाला. यानंतर ती ‘पहला-पहला प्यार’ या सिनेमात झळकली. या सिनेमापूर्वी तिने संजय कपूरसोबत ‘प्रेम’ सिनेमात काम केले होते. पण हा सिनेमा तयार होण्यासाठी 8 वर्षांचा कालावधी लागला. दरम्यान, तब्बूने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण केली आणि पुढे हिंदीसोबत तमिळ, मल्याळम, तेलुगू, इंग्रजी, बंगाली आणि मराठी सिनेमांतही तिने काम केले.
.. त्यामुळे मी अजूनही सिंगल
तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी झाला. आज तब्बू वयाच्या 54 व्या वर्षात आहे. असे असूनही तिने अद्याप लग्न केलेलं नाही. तब्बूकडे पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धी सगळं काही आहे. पण वैयक्तिक आयुष्यातील संकटांचा सामना मात्र ती एकटीच करतेय. प्रोफेशनल आयुष्यात यशाचा उच्चांक गाठूनदेखील अभिनेत्रीने लग्न का केलं नसेल, याबाबत कायम वेगवेगळे तर्क लावण्यात आले. यावर एका मुलाखतीत अभिनेत्रीने प्रकाश टाकला होता. तिने स्वतःच्या लग्नाबद्दल फार मोठं वक्तव्य केलं होतं. ज्याची प्रचंड चर्चा झाली.
यावेळी तब्बूने म्हटल्याप्रमाणे, बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यामुळे तिच्या आयुष्यात एकटं राहण्याचे दिवस आले. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण आहे. अभिनेत्री तब्बूने सांगितले, ‘माझा भाऊ समीर आर्या आणि अजय देवगण माझ्या शेजारीच राहायला होते. दोघेही कायम माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. समजा एखादा मुलगा माझ्या आसपास दिसला तर दोघे त्याला धमकवायचे नाहीतर मारायचे. याच कारणामुळे मी आजही सिंगल आहे’.
View this post on Instagram
एकेकाळी तब्बू आणि अजय देवगण यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. मात्र, अजयने काजोलसोबत लग्न केले आणि तब्बू मात्र एकटीच राहिली. आजही तब्बू आणि अजय यांच्यात निखळ मैत्री आहे. त्यांनी एकत्र बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. आगामी काळातही प्रेक्षक या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
नागार्जुनसोबत करायचे होते लग्न, पण..
अभिनेत्री तब्बू आणि साऊथचा सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन हे तब्बल 10 वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. तब्बूला नागार्जुनसोबत लग्न करायचं होतं पण त्याने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी नकार दिला. परिणामी त्यांचं नातं इथेच संपलं आणि पुढे तब्बूच्या आयुष्यात कुणाची एंट्री झालीच नाही. या नात्यातून बाहेर पडल्यानंतर तिने लग्न करण्याचा विचार केला नाही. त्यामुळे आजही तब्बू अविवाहित आहे.
हेही पहा –
Nadaaniyan Movie : नादानियांमध्ये स्टारकिड्ससोबत झळकणार बॉलिवूडचे दिग्गज तारे