नागार्जुनसोबत लग्न करण्यासाठी तब्बूने पाहिली 10 वर्ष वाट

90 च्या दशकापासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या तब्बूचा आज 52 वा वाढदिवस आहे. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 रोजी हैदराबादमधील एका मुस्लीम कुटुंबात झाला. तब्बूने 90 च्या दशकापासून विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही तब्बू तिच्या अनेक चित्रपटांतील भूमिकांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तब्बूचा ‘भुलभूलैया 2’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच आगामी काळात तब्बूचा ‘दृश्यम 2’ देखील प्रदर्शित होणार आहे. याचित्रपटांमुळे तब्बू सध्या चर्चेत आहे.

दरम्यान, चित्रपटांव्यतिरिक्त तब्बू तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. 52 वर्षाच्या तब्बूने अजूनही लग्न केलं नाही. मात्र, पूर्वी तब्बूचे नाव अभिनेता नागार्जुनसोबत जोडलं जायचं. तब्बूला नागार्जुनसोबत लग्न करायचे होते. तब्बूने नागार्जुनसोबत लग्न करण्यासाठी जवळपास 10 वर्ष वाट पाहिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बूचे नाव आधी संजय कपूर मग साजिद नाडियाडवाला आणि त्यानंतर नागार्जुनसोबत जोडले गेले होते. असं म्हणतात की, नागार्जुन तब्बूला डेट करत होता. त्यावेळी नागार्जुनचा त्याच्या आधीच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

नागार्जुनचा त्याच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने अमला सोबत लग्न केले. त्यानंतर त्याच्या आयुष्यात तब्बू आली. मीडियामध्ये त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक बातम्या येऊ लागल्या. तसेच नागार्जुन आणि तब्बूचे प्रेमप्रकरण नागार्जुनची बायको अमलाला सुद्धा कळाले होते. तब्बू आणि नागार्जुन जवळापास 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यानंतर नागार्जुन तब्बूसोबत लग्न करण्यासाठी तयार नसल्याचं तब्बूच्या लक्षात आलं. त्यानंतर तब्बूने स्वतः त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला.

 


हेही वाचा :

प्रियंका चोप्राचा मिस वर्ल्डचा किताब वादात; आयोजकांच्या फेव्हरमुळे…, प्रतिस्पर्धीचा आरोप