‘भोला’च्या सेटवर तब्बूच्या डोळ्यांना झाली गंभीर दुखापत

हैदराबादमध्ये 'भोला' चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, यावेळी तब्बूला एक स्टंट दरम्यान गंभीर दुखापत झाली. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तब्बूच्या डोळ्यावर गंभीर जखम झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या आगामी भोला चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या त्याचं चित्रपटात्या शूटिंदमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तब्बू एका महिला पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये तब्बूसोबत अजय देवगण देखील मुख्य भुमिकेत असेल. अजय देवगण आणि तब्बूच्या या चित्रपटाचं शूटिंग सध्या हैदराबादमध्ये चालू आहे. दरम्यान, भोलाच्या सेटवर अभिनेत्री तब्बूला दुखापत झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे.

स्टंट करताना तब्बूला झाली दुखापत

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

हैदराबादमध्ये ‘भोला’ चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, यावेळी तब्बूला एक स्टंट दरम्यान गंभीर दुखापत झाली. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, तब्बूच्या डोळ्यावर गंभीर जखम झाली आहे. एका अॅक्शन सीन दरम्यान ट्रक आणि मोटरसायकलच्या आपापसात टक्कर झाली ही टक्कर इतक्या जोरात होती की त्यावेळी तब्बूच्या डोळ्याच्या वरील भागात काच लागली आहे. सेटवरील डॉक्टरांच्या मते, ही जखम जास्त गंभीर नाही. टाके मारण्याची गरज नाही. जखम पूर्ण ठीक होईपर्यंत अजय देवगणने तब्बूला विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसली होती तब्बू
मागील काही महिन्यांपूर्वी तब्बू ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तब्बूने महत्वाची भूमिका साकारली होती. कार्तिक, आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बूचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.


हेही वाचा :अ‍ॅक्शन सीनदरम्यान शिल्पा शेट्टीच्या पायाला झाली गंभीर दुखापत