‘आधी तुझ्या मुलीला सांभाळ’……..फराह खानचं चंकी पांडेला सनसनीत उत्तर

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. तिचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. अनन्या वारंवार सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक गमतीदार व्हिडिओ अनन्याने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनन्याबरोबर फराह खानसुद्धा दिसत आहे.

अनन्या पांडे आणि फराह खानचा या मजेशीर व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. इतकचं नव्हे तर अनन्या पांडेच्या या व्हिडिओवर तिचे वडील चंकी पांडेने सुद्धा एक कमेंट केली आहे. मात्र चंकी पांडेने कमेंटकरून फराह खानशी पंगा घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

या व्हिडिओच्या सुरूवातीला अनन्या स्वताःची ओळख करून देते, तेवढ्यात फराह मधेच येऊन तिला थांबवत म्हणते,”अनन्या तुला ‘खाली पीली’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.” फराहचे हे बोलणं ऐकल्यानंतर अनन्या पांडे खूप खूश होते. इतक्यात फराह खान चंकी पांडे स्टाइलमध्ये ‘आय एम जस्ट जोकिंग’ असं म्हणते.

 

या गमतीदार व्हिडिओवर चंकी पांडे कमेंट करून म्हणतो की, फराह तुला या व्हिडीओसाठी ओव्हरअॅक्टींगचा पुरस्कार मिळाला पाहिजे.” चंकी पांडेला तोडीसतोड उत्तर देत फराह खान म्हणाली की, “सर्वात आधी तुझ्या मुलीला सांभाळ” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.


हेही वाचा :‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या नव्या रिलीज डेटची घोषणा