घरमनोरंजनहिरो नसलेला महेशचा सिनेमा

हिरो नसलेला महेशचा सिनेमा

Subscribe

ठिकाना हासुद्धा महेशचा असाच एक सिनेमा. एक अपयशी, खिसे रिकामे असलेला वकील,(अनिल कपूर), शशी (स्मिता पाटील) आणि बाहेरचं व्यवहारी जग, त्याविरोधात असलेलं अंतर्मन यातलं द्वंद्व महेश भटने ठिकानातून समोर आणलं होतं. कब्जामधला रवी (संजय दत्त) ज्याला ब्रेन ट्यूमर आहे. त्याचा इलाज करायला त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.

महेश भट्टच्या चित्रपटांचा आपला असा एक हुकमी प्रेक्षकवर्ग आहे. सामान्यांच्या जगण्याचं कथानक हे त्याच्या चित्रपटांचं वैशिष्ठ्य. मानवी जाणिवेची मर्यादा महेश भटच्या चित्रपटातून समोर येते. इथं नायक असतो. पण त्याला मानवी मर्यादा असतात. तो एकटा दहा गुंडांना एकाचवेळी मारू शकत नाही. म्हणून विशेष फिल्मच्या सिनेमात नायक बर्‍यापैकी गुंडांचा मार खाणारा असतो. हेही खरंच की अलिकडे विशेष फिल्म्सचे चित्रपट अवास्तव बोल्ड प्रसंगामुळे वादग्रस्त चर्चेत येतात. त्यावर महेश भट्ट म्हणतो, की असं हे चालू राहणारच, वेळेनुसार बदल होणारच, नव्या पिढीच्या आवडीनिवडी त्याआधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या असणारच. आणि चित्रपट हा व्यवसाय आहे, त्यात काळानुसार बदल अपरिहार्य आहे.

हे खरं असलं, तरी महेशच्या सिनेमाचा ढाचा बदललेला नाही. त्याच्या चित्रपटाचा नायक पाचपन्नास कंपन्यांचा मालक नसतो. सारांशमध्ये अनुपम खेर आपल्या मुलाच्या अस्थी मिळवण्यासाठी संघर्ष करतो. सरकारी लालफितीचा कारभार सर्वसामान्यांना कसा त्रासाचा ठरतो हे याचं कथानक. अर्थमध्ये प्रेमाचा त्रिकोण असतो. ज्यात स्मिता पाटील आणि कुलभूषण खरबंदा यांच्यातल्या विवादित विवाहबाह्य प्रेमसंबंधाना कुलभूषणची पत्नी शबाना फैलावर घेते. यातली तिची नवर्‍याकडून होणारी घुसमट आणि शिवीगाळ करण्याची पद्धत, या सर्वच व्यक्तिरेखा मानवी मर्यादेत असतात. त्या कुठंही नायक किंवा नायिका नसतात.

- Advertisement -

डॅडीमध्ये परिस्थितीने हरवलेला हताश गायक आत्मविश्वास गमावून जगाच्या नजरेत, पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असलेला, अल्कोहॉलिक असलेला असा बिनकामाचा केवळ अडगळ ठरतो. हा आनंद सरीन (अनुपम खेर) ने तंतोतंत उभा केला आहे. त्याचा त्याचीच मुलगी तिरस्कार करतेय. दारूमुळे झालेल्या आनंद सरीनच्या अध:पतनातून त्याच्या मुलीला त्याला वाचवायच आहे. सामान्य बाप आणि सामान्य मुलगी असलेली ही कथा. महेश भट्टने परिणामकारकपणे पडद्यावर उभी केली. ऐंशीच्या दशकात महेश भट्टचा आवरगी रिलीज झाला. यात आझाद नावाचा गुंड लाला (अनुपम खेर)ने पाळलेला आहे. या गुंडाला मीना नावाच्या नायिकेशी प्रेम होतं. तिच्याशी लग्न करून माणसात येण्याची आझादची धडपड कमालीची मानवी मर्यादेत असते. महेशच्या चित्रपटातला हिरो, प्रचलित अर्थानं हिरो कधीच नसतो. सडक मधला टॅक्सी ड्रायव्हर रवी, मुंबईत हरवलेल्या बहिणीला शोधतोय. त्याच्या बहिणीला लग्नाचं आमिष दाखवून एकानं पळवून नेलंय. सडकमधली सगळी माणसं शहरात जगणारी कामगार वर्गातली, उपेक्षित घटकातली असतात.

ठिकाना हासुद्धा महेशचा असाच एक सिनेमा. एक अपयशी, खिसे रिकामे असलेला वकील,(अनिल कपूर), शशी (स्मिता पाटील) आणि बाहेरचं व्यवहारी जग, त्याविरोधात असलेलं अंतर्मन यातलं द्वंद्व महेश भटने ठिकानातून समोर आणलं होतं. कब्जामधला रवी (संजय दत्त) ज्याला ब्रेन ट्यूमर आहे. त्याचा इलाज करायला त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.

- Advertisement -

महेश भट्टचा कुठलाही चित्रपट बाहेर काढा, एक गोष्ट मात्र जाणवतेच, त्याच्या चित्रपटातला नायक हा सर्वसामान्य माणूस असतो. मग तो नोकरी कब्जा तला शोधणारा बेरोजगार युवक असेल. आशिकीतला राहुल म्हणजेच राहुल रॉय आणि अनु अग्रवाल आठवून पहा. दिल है की मानता नही, मधला रघु जेटली ( आमिर खान)हा बातमीदार, हे सगळे सामान्य घरातले. नायक नायिकेचे सामान्यपण हे महेशच्या सिनेमाचं वैशिष्ठ्य. सामान्य माणसाचा संघर्ष हा त्याचा विषय. त्याच्या सिनेमात हिरो हिरोईन 5 ते 10 हजाराची पार्ट टाइम नोकरी करून, स्टेशन किंवा बस स्टॉपवर भेटणारे असतात.

महेश भटच्या सिनेमात मोठे सेट्स नसतात. पराकोटीची श्रीमंती नसते. एन आर आय व्यक्तिरेखांचे देशप्रेम नसते. गाड्यांची उडवाउडवी नसते. खूप हाणामारी नसते. हिरोंचे अवास्तव स्टंट नसतात. मानवी मर्यादा असतात. मग तो काशमधला हतबल बाप असेल किंवा अलीकडच्या गँगस्तरमधला गुंड असेल. नाममधला दुबइतल्या गुन्हे जगात अडकलेला भाऊ असेल. किंवा गुमराहमध्ये ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकलेली नायिका (श्रीदेवी) असेल. ही माणसं परिस्थितीपुढे हतबल असतात, त्यामुळे ती हिरो नसतात. प्रेक्षकांना म्हणून ती त्यांच्यातली वाटतात, हेच महेशच्या सिनेमाचं यश….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -