Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनTamannaah Bhatia and Vijay Varma Breakup : तमन्ना- विजयचं ब्रेक अप? नेमकं झालं तरी काय?

Tamannaah Bhatia and Vijay Varma Breakup : तमन्ना- विजयचं ब्रेक अप? नेमकं झालं तरी काय?

Subscribe

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचं नातं एका सुंदर वळणावर येऊन पोहोचलं होतं. लवकरच ते लग्न करणार असंही बोललं जात होतं. अशातच आता त्यांचं नातं संपुष्टात आलं असून त्यांनी ब्रेकअप केल्याचं बोललं जातंय. इतकंच नव्हे तर यापासून पुढे ते फक्त चांगले मित्र म्हणून राहतील, असा निर्णय घेतल्याचं समजतंय. पण त्यांच्या वेगळं होण्याचं नेमकं कारण काय? ते आज जाणून घेऊया. (tamannaah bhatia and vijay varma breakup after 2 years of dating)

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचं ब्रेक अप?

तमन्ना आणि विजय वर्मा हे अत्यंत ट्रेंडिंग कपल असल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याबाबत कायम चर्चा असायची. लवकरच ते लग्न करणार असल्याच्या चर्चांनी एकीकडे जोर धरला असताना दुसरीकडे त्यांचं ब्रेक अप झाल्याचं समजतंय. या बातमीने त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. आधी मैत्री आणि त्यातून फुललेलं यांचं प्रेमाचं नातं संपण्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तर तमन्ना आणि विजय वर्मा यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नातं संपलंय.

इथून पुढे ते दोघे फक्त आणि फक्त मित्र राहतील. तसेच त्यांनी डेटिंग करणंसुद्धा थांबवल्याचं समजतंय. दोघांनीही सहमतीने प्रेमसंबंध संपवले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरून सोबतचे फोटोदेखील डिलीट केले आहेत. यामुळे त्यांचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्यांना दुजोरा मिळतोय. आता हे नातं संपल्याची अधिकृत घोषणा तमन्ना आणि विजय कधी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नातं संपलं.. पण का संपलं? यावर तमन्ना आणि विजयचं प्रकाश टाकू शकतील असे निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

‘लस्ट स्टोरीज 2’पासून सुरू झालेली लव्हस्टोरी

‘लस्ट स्टोरीज 2’ या वेब सीरिजमध्ये तमन्ना आणि विजय एकत्र झळकले होते. या सिरीजमध्ये दोघांनीही खूप बोल्ड सीन दिले होते. यानंतर त्यांच्या डेटिंग आणि रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र दिसायचे. शिवाय पॅपराझींना फोटोंसाठी कपल पोजसुद्धा द्यायचे. विशेष म्हणजे त्यांनी आपलं नातं कुणापासून लपवून ठेवलं नव्हतं. पण आता गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे तमन्ना आणि विजय यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत.

हेही पहा –

Bobby Deol : बाबा निराला साकारताना घाबरला होता बॉबी देओल, म्हणाला