‘बाहुबली’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. नवीन वर्षाची नुकतीच सुरुवात झाली. अनेक कलाकारांच्या न्यू ईअर पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ आता समोर येऊ लागले आहेत. अशातच तमन्ना भाटियाचा न्यू ईअर पार्टी दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना एका अभिनेत्यासोबत रोमाँटिक झालेली दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तमन्ना या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमद्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
कोण आहे हा अभिनेता?
तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या या अभिनेत्याचं नाव विजय वर्मा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमन्ना भाटिया न्यू ईअर पार्टीला आपल्या खास मित्रांसोबत गोव्याला पोहोचली होती. या पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात तमन्ना आणि विजय एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. शिवाय त्यानंतर हे दोघेही एकमेकांना किस करत आहेत. यामुळे आता हे दोघेही नक्कीच रिलेशनशिपमध्ये असणार असं म्हटलं जात आहे. दरम्यान, याआधी देखील तमन्ना आणि विजय वर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांना ते रिलेशनशिपमध्ये असल्याची खात्री झाली आहे.
View this post on Instagram
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा स्पष्ट दिसत नाहीत. कारण हा व्हिडओ खूप लांबून शूट करण्यात आला आहे.
‘या’ चित्रपटात दिसणार तमन्ना
तमन्ना हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये सक्रिय असते. येत्या काळात तमन्ना नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चूडिया’मध्ये दिसणार आहे. तसेच विजय वर्माला याआधी आलिया भट्टसोबत डार्लिंग्समध्ये दिसला होता.
हेही वाचा :