घरमनोरंजनतमन्ना भाटीया करणार 'या' अभिनेत्याला डेट

तमन्ना भाटीया करणार ‘या’ अभिनेत्याला डेट

Subscribe

तमन्ना भाटियाना विकीबरोबर डेटवर जायची इच्छा व्यक्त केली आहे. आता विकी कौशल यावर काय उत्तर देणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

अभिनेता विकी कौशल सध्या लाखो तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. ‘उरी:द सर्जिकल स्ट्राईक्स’ नंतर तर विकी कौशलच्या प्रेमात सगळेच वेडे झाले आहे. या चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रीही मागे नाहीयेत. अनेक अभिनेत्री सध्या विकीच्या प्रेमात पडल्या आहेत. त्यात तमन्ना भाटियानेतर विकीबरोबर डेटवर जायची इच्छा व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

Munda lashkaare maarda! ?

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

 एका मुलाखतीत तीने विकीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तर या आधी विकी हरलीन सेठीला सोबत डेट करत होता. मात्र गेले दिवस त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेला ऊत आला आहे. विकीने एका मुलाखतीत कतरिनासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या या इच्छेमुळे हरलीन आणि त्याच ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्या ब्रेकअप मागे कतरीना नसून अभिनेत्री भुमी पेडणेकर असल्याचं समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

Hello beautiful! Hosting, performing, winning… last night was too special! Thank You Filmfare! @filmfare #Sanju #BestSupportingActor ??

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

- Advertisement -

 आता तमन्नाने व्यक्त केलेल्या इच्छेवर विकी काय उत्तर देणार? तो तमन्नाबरोबर डेटवर जाणार का? हे बघणं महत्त्वाच ठरणार आहे. सध्या विकीचा करिअर ग्राफ उंचावत आहे. राझी, ‘उरी:द सर्जिकल स्ट्राईक्स’ या धमाकेदार चित्रपटाबरोबरच यावर्षीचा बॉलिवूड मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कारही विकीला मिळाला आहे. राझी चित्रपटासाठी विकीला सहय्यक अभिनेतासाठी फिल्मफेअर मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -