अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांचं ब्रेकअप झाल्याचे वृत्त अलीकडेच समोर आले. पण त्यांच्या ब्रेकअपचं कारण स्पष्ट झालं नव्हतं. दोघांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा मिळाला. यानंतर आता त्यांच्या अगदी जवळच्या मित्राने एका मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्याने तमन्ना आणि विजयच्या वेगळे होण्याचे कारण सांगितले आहे. (Tamannah Bhatia & Vijay Varma Breakup Reason Revealed)
भविष्याबद्दलचे विचार जुळत नव्हते
तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या एका मित्राने सांगितले की, ‘त्या दोघांचे एकत्र भविष्याबद्दलचे विचार जुळत नव्हते. तमन्नाला लवकरात लवकर लग्न करण्याची ईच्छा होती. तर विजयला इतक्या लवकर कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. तो स्वतःची कमिटमेंट स्पष्ट करू शकत नव्हता. यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला’. यावर्षी विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया लग्न करणार असल्याची चर्चा होती. शिवाय मुंबईत ते एक आलिशान घर शोधत असल्याच्या बातम्यांनीदेखील जोर धरला होता. पण आता ब्रेकअप झाल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले आहेत.
कपल पोस्ट केल्या डिलीट?
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दोघांनीही ब्रेकअपनंतर सोशल मीडियावरून कपल पोस्ट डिलीट केल्याचे सांगितले जात होते. मात्र, दोघांच्याही इंस्टाग्राम हॅण्डलवर त्यांचे सोबतचे फोटो विसिबल आहेत. गतवर्षी तमन्नाने गोव्यात विजयसोबत तिचा वाढदिवस साजरा केला होता. या सेलिब्रेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. दोघांचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. एका मुलाखतीत विजय म्हणाला होता की, आमच्याकडे 5 हजारांहून अधिक फोटो आहेत’.
विजय आणि तमन्ना यांनी 2023 मध्ये आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. विजयने एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते, ‘जर आम्ही एकमेकांना आवडत असू तर आम्हाला नातं लपवण्याची गरज नाही. आमचे एकमेकांसोबत पाच हजार फोटो आहेत. पण हे फोटो आमच्या दोघांचे आहेत. ते जगाला दाखवण्याची गरज नाही’. 2023 मध्ये ‘लस्ट स्टोरीज २’ या सिनेमात तमन्ना आणि विजय एकत्र झळकले होते. दोघांची केमिस्ट्री फार चर्चेत आली होती. सिनेजगतातील ट्रेंडिंग कपल्सपैकी एक म्हणून हे कपल ओळखलं जायचं. पण अखेर तमन्ना आणि विजयने या नात्याला पूर्णविराम लावल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही पहा –
Ashi Hi Jamva Jamvi : दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी, अशी ही जमवा जमवीचे पोस्टर प्रदर्शित