दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रमची प्रकृतीत सुधारणा, अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना

tamil actor vikram heart attack admitted to hospital chennai

तेलुगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम याची प्रकृती खालावली होती.  त्याला अचानक छातीत दुखू लागल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र अभिनेत्याची अँजिओग्राफी करण्यात आली असून एका दिवसात डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. 56 वर्षीय विक्रम याने अपरिचित आणि आय सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह त्याने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची कसब दाखवली आहे.

अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने ट्विटरवर त्यांच्या आरोग्य अपडेट शेअर केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, विक्रमची प्रकृती स्थिर आहे. यासोबतच व्यवस्थापकाने चाहत्यांना आणि युजर्सना अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

विक्रमचे व्यवस्थापक सूर्यनारायणन यांनी लिहिले, “प्रिय चाहते आणि हितचिंतकांनो, चियान विक्रम यांना अचानक हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. पसरवले जाणारे सर्व अहवाल चुकीचे आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, गोपनीयतेची काळजी घ्यावी. त्यांना एका दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी आशा आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikram (@the_real_chiyaan)

अभिनेता विक्रम 8 जुलै रोजी त्याच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ या चित्रपटाच्या टीझर लॉन्चिंग सोहळ्यात उपस्थित राहणार होता, परंतु अचानक त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. हा टीझर लॉन्च सोहळा चेन्नईमध्ये झाला. या चित्रपटात विक्रम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या एपिक ड्रामा चित्रपटाचे दोन पार्ट आहेत. या चित्रपटातून ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मणिरत्नम यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे.

विक्रम शेवटचे ‘महान’ चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. अभिनेत्याने त्याचा मुलगा ध्रुव विक्रमसोबत स्क्रीन शेअर केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुबराज यांनी केले होते. विक्रमचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विक्रमने तमिळ, तेलगू आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे. 2004 मध्ये विक्रमला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय विक्रमला सात फिल्मफेअर पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि तामिळनाडू सरकारचा कलईमामणी पुरस्कारही मिळाला आहे. 1990 मध्ये विक्रमने अभिनय जगतात प्रवेश केला. ‘सेतू’ चित्रपटाने तो खूप प्रसिद्ध झाला. या चित्रपटासाठी विक्रमने २० किलो वजन कमी केले होते. ‘सेतू’ नंतर विक्रमने ‘जेमिनी’, ‘समुराई’, ‘धुल’, ‘कधल सदुगुडू’, ‘सामी’, ‘पिथामगन’, ‘अरुल’, ‘अन्नियां’, ‘भीमा’, ‘रावणन’, ‘गेली’ आहेत. ‘दीवा थिरुमगल’, ‘डेविड’, ‘इरु मुगन’ आणि ”महान’सह अनेक हिट चित्रपट दिले.


धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले