घरमनोरंजनतमिळ सुपरस्टार विष्णू विशाल आणि बॕडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच अडकणार विवाहबंधनात

तमिळ सुपरस्टार विष्णू विशाल आणि बॕडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच अडकणार विवाहबंधनात

Subscribe

ज्वाला गुट्टा आणि विष्णू विशाल हे सेलिब्रिटी जोडपे अनेक काळापासून एकमेकांना डेट करत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे नाते सोशल मीडियाद्वारे जाहीर केले.

भारतीय बैटमिनटनपटू ज्वाला गुट्टाने तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्वाला गुट्टा आणि तमिळ सुपरस्टार अभिनेता विष्णु विशाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. विशाल ने ‘अरन्या’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इवेंटमध्ये याबाबत खुलासा केला होता. पण आता सोशल मीडियाद्वारे लग्नाची पत्रिका शेअर करत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ज्वाला आणि विष्णु विशाल यांनी साखरपुडा केला होता. आता या महिन्याच्या अखेरीस २२ एप्रिल रोजी लग्न करणार असल्याचे दोघांनी जाहीर केले आहे. विष्णूने लग्नाची पत्रिका सोशलमीडियावर शेअर करत, ”आपल्या कुटुंबाच्या आशिर्वादाने , आमच्या लग्नाची बातमी सांगताना आनंद होत आहे. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा खासगी विवाहसोहळा पार पडणार आहे. प्रेम, निष्ठा, मैत्री आणि एकत्रतेच्या या प्रवासाला सुरुवात करताना तुम्ही ज्या प्रेमावर वर्षाव केला आहे त्या बद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.” अशी पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishnu Vishal (@thevishnuvishal)

ज्वाला गुट्टा आणि विष्णू विशाल हे सेलिब्रिटी जोडपे अनेक काळापासून एकमेकांना डेट करत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे नाते सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. यापूर्वी विष्णू विशालचे रजनी नटराजशी लग्न झाले होते व त्यांना आर्यन नावाचा एक मुलगाही आहे. मात्र काही कारणास्तव २०१८ मध्ये विष्णू विशाल आणि रजनी वेगळे झाले. ज्वाला गुट्टाचेही हे दुसरे लग्न असून यापूर्वी तिटे चेतन आनंदशी झाले होते. व दोघांनी २०११ मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र आता विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हैदराबाद येथे खासगी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

हे वाचा- बबन फेम भाऊसाहेब शिंदेची ‘रौंदळ’ चित्रपटातील धडाकेबाज भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -