Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तामिळ अभिनेता इंद्र कुमारने केली आत्महत्या

तामिळ अभिनेता इंद्र कुमारने केली आत्महत्या

Related Story

- Advertisement -

मनोरंजन विश्वासाठी २०२० हे वर्ष अत्यंत वाईट होते. गेल्या वर्षी अनेक दिग्गज सेलिब्रिटींचा मृत्यू झाला. आता नव्या वर्षाची सुरुवात लोकं नव्याने करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजूनही अनेक कलाकार आत्महत्या करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ चित्रपट काम करणाऱ्या अभिनेता संदीप नाहरने आत्महत्या केली होती. आता तामिळ टेलिव्हिजन अभिनेता इंद्र कुमारने आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार इंद्र कुमारने आपल्या मित्रांच्या घरात गळफास लावला.

नक्की काय घडले?

इंद्र कुमार आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. तिथे त्याने सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा याबाबत इंद्र कुमारच्या मित्राला समजले तेव्हा त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. इंद्र कुमार याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस आता याप्रकरणाबाबत तपासणी करत आहेत. इंद्रच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘बुधवारी रात्री इंद्र आपल्या मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेला होता. त्यानंतर तो मित्राच्या घरी एकटाच होता. जेव्हा मित्राने सकाळी खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा इंद्राने दरवाजा खोलला नाही. त्यानंतर जेव्हा मित्राने दरवाजा खोलला तेव्हा इंद्राचा मृतदेह आढळला.’

- Advertisement -

याप्रकरणी आता पोलीस तपास करत आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. तसेच इंद्राने हे धक्कादायक पाऊल का उचलले हे अद्याप समजले नाही आहे. इंद्र कुमारने तामिळ टेलिव्हिजनमध्ये अनेक मालिका केल्या आहेत. सध्या तो नव्या प्रोजेक्ट शोधात होता. माहितीनुसार, इंद्राचे लग्न झाले असून त्याला एक मुलं आहे.


हेही वाचा – अभिनेता संदीप नाहरच्या आत्महत्येने नेटकरी आक्रमक, केली न्यायाची मागणी


- Advertisement -

 

- Advertisement -