घरताज्या घडामोडीअभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही, तांडवला SC कडून दिलासा नाहीच

अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही, तांडवला SC कडून दिलासा नाहीच

Subscribe

तांडवचे निर्माते याविषयी हायकोर्टात अपील करु शकतात. त्याचबरोबर कोर्टाकडून पोलिसांना असे सांगण्यात आले आहे की, जर वेब सिरिजमधून तो कॉन्टेंट काढून टाकला असेल तर पोलिसांनीही हे प्रकरण बंद करु शकतात, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली तांडव ही वेब सिरिज रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली. वेब सिरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे वेब सिरिज वादात सापडली. वेब सिरिजमधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्यामुळे तांडव ही वेब सिरिज वादात आली. वेब सिरिज बंद करण्यासाठी दिग्दर्शक आणि वेब सिरिजच्या टिमच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. तांडवच्या अभिनेता आणि निर्मात्यांनी त्याच्याविरोधात केलेली एफआयआर मागे घेण्यासाठी उच्च न्यायालयात मागणी केली. याचिकेची सुनावणी करण्यात आली अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही असे सुप्रीम कोर्टांने म्हटले आहे. या सुनावणीच्या वेळी तांडव टिमचे सिनिअर वकिल फली नरिमन यांनी सांगितले की, वेब सिरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपहार्य कॉन्टेट आम्ही काढू टाकला आहे. दाखवण्यात आलेल्या सीन बद्दल आम्ही माफीही मागितली आहे. आता या केसमध्ये काही राहिले नाही. ज्या सीनमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तो सीन आम्ही काढून टाकला आहे, असे ते म्हणाले.

तांडवचे निर्माते याविषयी हायकोर्टात अपील करु शकतात. त्याचबरोबर कोर्टाकडून पोलिसांना असे सांगण्यात आले आहे की, जर वेब सिरिजमधून तो कॉन्टेंट काढून टाकला असेल तर पोलिसांनीही हे प्रकरण बंद करु शकतात, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. सुनावणी नंतर तांडवला सुप्रीम कोर्टात कोणताही दिलासा मिळालेला नाही. तांडव टिमच्या वकिलांनी सांगितले की, तांडवच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. निर्मात्यांना प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही. त्यामुळे एफआयआर मुंबईतच क्लब करण्यात याव्यात.

- Advertisement -

तांडव वेब सिरिजच्या विरोधात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. अटक करण्यापासून सुटका करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यासाठी निर्मात्यांनी हायकोर्टात याचिका दाखल करावी असे सांगण्यात आले आहे. अभिनेता मोहम्मद जीशान अय्यूब यांच्यासह तांडवच्या निर्मात्यांना संरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.


हेही वाचा – Tandav Controversy: ‘पद्मावत’नंतर करणी सेनाचं ‘तांडव’बाबत धक्कादायक वक्तव्य

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -