‘तान्हाजी’ चित्रपट दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल

tanhaji the unsung warrior box office collection day 14 ajay devgn film huge earning tanhaji the unsu
‘तान्हाजी’ चित्रपट

‘तान्हाजी’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. अजय देवगन, काजोल, सैफ अली खान यांसारख्या अनेक उत्कृष्ट कलाकारांनी भरलेला ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपट तिकीट खिडकीवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला मोठ्याप्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. १० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ने केवळ १४ दिवसांमध्ये १९२ कोटी २८ लाख रुपयांची जोरदार कमाई केली आहे. यातील ७८ कोटी १६ लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कमावले आहेत.

गेल्या काही काळात मोठ्याप्रमाणावर वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळत आहे. तर काही चित्रपटांना अपयश मिळत आहे. परंतु ‘तान्हाजी’ चित्रपटाने अनेक वाद- विवादानंतरही दुसऱ्या आठवड्यात विक्रमी कमाई केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा चित्रपट ७८ कोटी १६ लाख रुपयांसह दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा आठव्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी भारतीय चित्रपट इतिहासात दुसऱ्या आठवड्यात ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणे केवळ सातच चित्रपटांना शक्य झाले आहे आणि या यादीत आता ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट देखील स्थान मिळवले आहे.


हेही वाचा – अतुल गोगावले लवकरच आता छोट्या पडद्यावर