ठरलं! तान्हाजी चित्रपट मराठीत येणार; ‘या’ दिवशी होणार ट्रेलर आऊट!

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी:द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटात अजय देवगणसह काजोल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती सूभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. हा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठीतही असावा अशी मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. आता हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित होणार आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिने अभ्यासविश्लेषक तरण आदर्शने ट्वीटकरत ही माहिती सगळ्यांना दिली.

तान्हाजी हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी २०२० प्रदर्शित होणार आहे. तर मराठी तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर १० डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. तान्हाजी मराठीमध्ये येणार म्हटल्यावर सध्य़ा प्रेक्षकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. या चित्रपटात शरद केळकर (छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत), देवदत्त नागे ( सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलारमामा) या मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी सिंहासारखे लढणारे तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तान्हाजी मालुसरे हे अत्यंत पराक्रमी आणि विश्वासू साथीदार होते. अजय-काजोल या दोघांशिवाय सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, शरद केळकर यांच्या देखील मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.