Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनTanishaa Mukerji : 'सोबत राहण्यासाठी एका..' तनिषा मुखर्जीनं स्पष्टच सांगितलं

Tanishaa Mukerji : ‘सोबत राहण्यासाठी एका..’ तनिषा मुखर्जीनं स्पष्टच सांगितलं

Subscribe

तनिषा ही प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण म्हणून लोकप्रिय असली तरी तिनं देखील तिच्या अभिनयानं स्वताचा वेगळा असा चाहतावर्ग तयार केला आहे.सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या तनिषानं आता लग्नाच्याबाबत केलेली टिप्पणी ही लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी तनिषा ही अभिनेता अरमान कोहलीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. वर्षभर त्याला डेट केल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता ती एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

लग्नाविषयी तनिषा सांगते…

तनिषा म्हणते की, “लग्नाबाबत माझे विचार वेगळे आहेत. लग्न ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांना समजून घेतात. त्यांच्यात सुसंवाद असतो. त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांसाठी एका संस्थेसारख्या असतात ज्यांची मुळं संवादात आहेत. जे हे नात्याला समजतात त्यांचा प्रवास सुखकर होऊन जातो.”

“मला तुम्ही जेव्हा लग्नावरुन काही प्रश्न विचारु लागता तेव्हा माझे म्हणणे आणखी वेगळे होऊन जाते. मी मला आलेल्या प्रस्तावांचा विचार करु लागते पण ती गोष्ट पुढे काही सरकायला मागत नाही. प्रत्येकाला वाटते की, त्याच्या आय़ुष्यात एका खास व्यक्तीची एंट्री व्हावी जेणेकरुन त्याच्यासोबत आपल्याला प्रवासाला सुरुवात करता येईल”. अशा शब्दांत तनिषानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण?

तनिषानं देखील आतापर्यत वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती मराठी चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. २००३ मध्ये तनिषानं बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. मात्र तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून काही मिळाला नाही.

तनिषाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास ती एका फिल्मी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कुटूंबातून येते. तिचे वडील शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध निर्माते म्हणून लोकप्रिय होते. त्यांची आई तनुजा ही ८० च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली गेली. तर बहीण काजोल अजुनही बॉलीवूडमधील चर्चेतील अभिनेत्री आहे.