घरमनोरंजनबस्स हेच ऐकायचं बाकी होतं, वैवाहिक बलात्कार प्रकरणातील कोर्टाच्या निर्णयावर तापसी पन्नूने...

बस्स हेच ऐकायचं बाकी होतं, वैवाहिक बलात्कार प्रकरणातील कोर्टाच्या निर्णयावर तापसी पन्नूने व्यक्त केला संताप

Subscribe

वैवाहिक बलात्कार प्रकरणातील छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाविरोधात आज देशभरातून तीव्र संपात व्यक्त होत आहे. तर अनेकांनी या निर्णयावर टीका केली. कायदेशीररित्या पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार नाही, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला. छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील पत्नीचं वय १८ वर्षांपेक्षा कमी असून तिने आपल्या पतीविरोधात बलात्कार आणि अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर संबंधीत पतीने उच्च न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली होती. मात्र कोर्टाने पतीच्या बाजूने निर्णय दिल्याने सोशल मीडियावर टीका होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीने देखील या निर्णयाविरोधात तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे. तापसीने एक ट्वीट शेअर करत म्हटलं आहे की, आता हेच ऐकायचं बाकी होतं. एकूणचं तिने छत्तीसगड कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तापसी पन्नू नेहमीच अनेक सामाजिक विषयावर आपली भूमिका परखड भूमिका मांडत असते.

- Advertisement -

तापशी पन्नू शिवाय गायिका सोना मोहापात्रा हिने देखील कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपले मतप्रदर्शन केले आहे. सोना मोहापात्रा हिने ट्वीट करत लिहिले की, हे वाचल्यानंतर जो आजारपण मला जाणवत आहे ते इथे लिहिण्यापलीकडे आहे.

- Advertisement -

वकील वाय.सी.शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.के.चंद्रवंशी यांच्या बँचनं कायदेशीररित्या विवाहित पत्नीसोबर तिच्या इच्छेविरोधात किंवा बळजबरीने संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नाही असे म्हटलं आहे. या महिलेत आणि तिच्या पत्नीमध्ये काही कारणांवरुन वाद-विवाद होते. या दोघांच जून २०१७ मध्ये लग्न झालं होत. मात्र वादामुळे तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

लग्नानंतर काही दिवसातच तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ केला. यावर पत्नीने आरोप केला की, पती तिला शिवीगाळ करत मारहाण करायचा. दरम्यान अनेकदा पतीने तिच्या इच्छेविरोधात अनैसर्गिकरित्या शारीरिक संबंध ठेवले. चौकशीनंतर महिलेच्या पती आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करत आला. स्थानिक न्यायालयाने तक्रारीनंतर या पतीला आरोपी म्हणून देखील घोषित केले.


Fake Covid-19 Test Scam: कुंभमेळा बनावट कोरोना टेस्ट प्रकरणी उत्तराखंडतील दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -