डबल रोल नसूनही तापसी पन्नू दिसणार दुहेरी भूमिकेत; तापसीच्या ‘दोबारा’ चित्रपटाची चर्चा

या चित्रपटात तपासी खूपच भन्नाट लूक मध्ये दिसते आहे. तापसीच्या दोबारा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होते.

बॉलिवूड मधील ग्लॅमरस अभिनेत्री म्ह्णून ओळख असलेली तापसी पन्नू नेहमीच तिच्या चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत असते. तापसीच्या भूमिकांनाही प्रेक्षक पसंती देतात. ‘दोबारा’ या चित्रपटातून अभिनेत्री तापसी पन्नू आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तापसीच्या प्रत्येक चित्रपटाची आणि त्यातील तिच्या भूमिकेची चर्चा सुद्धा होत असते. ‘दोबारा’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री तापसी पन्नू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तपासी खूपच भन्नाट लूक मध्ये दिसते आहे. तापसीच्या दोबारा या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होते.

हे ही वाचा – ‘मराठी चित्रपटांचे प्रेक्षक कुठे आहेत? ते तर दाक्षिणात्य चित्रपट पाहतात’, महेश मांजरेकरांचं वक्तव्य

हिंदी टेलीव्हीजची राणी अशी ओळख असलेली निर्माती एकता कपूर आणि अनुराग कश्यप यांच्या नव्या युगातील थ्रिलर ‘दोबारा’ चा ट्रेलर ही त्याच्या रहस्यमय दुनियेतील रोलर कोस्टर राईडची सुरुवात आहे असे म्हणता येईल. या चित्रपटात तापसी पन्नू पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. चित्रपटाचा सस्पेन्स पुढे घेऊन जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या लूक च्या भूमिका तापसी या चित्रपटात साकारताना दिसणारा आहे. ‘दोबारा’ हा चित्रपट १९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रेक्षकांना चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा – मधुबाला यांच्या बायोपिकवर कुटुंबीयांचा आक्षेप, बहीण मधुर बृजभूषण म्हणाल्या…

‘दोबारा’ ही अनुराग कश्यपची एक प्रकारची ‘टाइम ट्रॅव्हल’ कथा आहे जी भारतीय प्रेक्षकांना लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. अनेक न उलगडलेल्या रहस्यांच्या दुनियेत अडकलेली तापसी पन्नू यात अशीच एक भूमिका साकारताना दिसणार असून प्रेक्षकांना ती दोन वेगवेगळ्या जगात फिरताना दिसेल. चित्रपट डबल-रोलचा शोध न घेता भूत आणि वर्तमानातील तिच्या उपस्थितीचा भ्रम स्वतंत्रपणे कॅप्चर करतो.

चित्रपट तिच्या सभोवतालच्या रहस्यांची उत्तरे शोधण्यासाठी संघर्ष करत असताना, ती दोन्ही टोके कशी जोडते हे पाहणे रोमांचक असेल.पुरस्कार विजेती अभिनेत्री तापसी पन्नू अभिनीत हा चित्रपट प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांच्या कल्ट मूव्हीजने याची निर्मिती केली आहे, बालाजी टेलिफिल्म्स आणि सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस (एथेना) अंतर्गत ही नवीन शाखा आहे.

हे ही वाचा – बाप्पासोबत खास फोटो: चिमुकल्या परीचा मराठमोळा साज; तिलाही लागलीय गणेशोत्सवाची आस