Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तारक मेहता मालिकेतील 'हे' कलाकार आहेत एकमेकांचे नातेवाईक

तारक मेहता मालिकेतील ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे नातेवाईक

Related Story

- Advertisement -

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेता राज अनादकत (टपु) आणि मुनमुन दत्ता (बबीता जी) हे दोघं डेटिंगच्या बातम्यामुळे चर्चेत आले आहेत. याबाबत रविवारी राज आणि मुनमुन यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आणि ट्रोलर्सना योग्य उत्तर दिले आहे. याबाबत मुनमुनने लिहिले की, ‘खासगी आयुष्याबद्दल माहिती नसतात, काहीही मनाचं लिहिण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? १३ वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे आणि तुम्हा लोकांना माझी प्रतिष्ठा उद्वस्त करण्यासाठी १३ मिनिटे लागली नाहीत.’ अशी संतप्त प्रतिक्रिया मुनमुनने व्यक्त केली. तर राज म्हणाला की, ‘माझ्याबद्दल माझ्या परवानगी शिवाय सतत लिहित असलेल्या प्रत्येकाने माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. अशा प्रकारच्या बातम्या लिहिणाऱ्या सगळ्यांनी तुमच्यामध्ये असलेली सर्जनशीलता इतर गोष्टींमध्ये वापरा, याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. देवा सद्बुद्धी दे.’ दरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत असे कलाकार आहेत, जे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

या मालिकेत सुरुवातीपासून अभिनेते अमित भट्ट आहेत. जेठालालचे वडील चंपकलाल ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. अमित भट्ट यांची दोन जुळली मुलं एकदा या मालिकेत दिसले होते. त्या दोघांनी एका सीनमध्ये दोन छोट्या मुलांची भूमिका केली होती.

- Advertisement -


मालिकेत टपूची भूमिका साकारलेला भव्या गांधी आणि गोगीची भूमिका करत असलेला समय शाह या दोघांमध्ये नातेसंबंध असल्याचे समोर आले आहे. हे दोघे चुलत भाऊ असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अभिनेत्री प्रिया आहूजा रीटा रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. प्रिया मालिकेत कधी-कधी दिसते. प्रियाचे लग्न मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदासोबत झाले आहे. दोघांना एक मुलगा आहे.


अभिनेत्री दिशा वकानी अनेक वर्षांपासून मालिकेत दिसली नाही. परंतु अजूनही या मालिकेचा ती हिस्सा आहे. या मालिकेत दिशा वकानी प्रमुख भूमिका दयाबेन करत होती. मालिकेमध्ये दयाबेनचा भाऊ सुंदरलाल वकानी याने साकारला होता. हे मालिकेतील भाऊ-बहीण खऱ्या आयुष्यात देखील भाऊ-बहीण आहेत.


दिशा वकानीचे वडीलसुद्धा या मालिकेतील एका सीनमध्ये दिसले होते.


हेही वाचा – सिद्धार्थ शुक्लाच्या डुप्लिकेटचे Video Viral, चाहते झाले भावूक


- Advertisement -