घरताज्या घडामोडीप्रेक्षकांना हसवणारा 'जेठालाल' मुलीच्या लग्नात भावूक! पांढऱ्या झालेल्या केसांनीच लेक चढली...

प्रेक्षकांना हसवणारा ‘जेठालाल’ मुलीच्या लग्नात भावूक! पांढऱ्या झालेल्या केसांनीच लेक चढली बोहल्यावर

Subscribe

नियतीच्या लग्नातील फोटोंमध्ये तिच्या पांढऱ्या झालेल्या केसांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा फेम जेठलाल म्हणजेच अभिनेते दिलिप जोशी यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. मुलीच्या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिलिप जोशी यांची मुलगी नियती जोशी हिने ११ डिसेंबर रोजी यशोवर्धन याच्याशी लग्न केले. दिलिप जोशी यांनी मुलीच्या लग्नाचा हळवा क्षण सर्वांसोबत शेअर केला आहे. गुजरातील पद्धतीने नाशिक येथे दिलिप यांच्या मुलीचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. प्रेक्षकांना हसवणारा जेठालाल मुलीच्या लग्नात मात्र अत्यंत भावूक झालेले पहायला मिळाले.

दिलिप जोशी यांनी मुलीच्या लग्नातील काही कॅन्डिड फोटो शेअर केले आहेत. दिलिप जोशी यांची पत्नी माला,मुलगी नियती आणि मुला ह्रत्विक यांच्यासोबत लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. ‘तुम्ही गाण्यात किंवा सिनेमात भावना उधार घेऊ शकता पण जेव्हा तुमच्या बाबतीत ते घडत तेव्हा तो अनुभव अतुलनीय असतो’, असे कॅप्शन लिहित दिलिप यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

दिलिप यांनी पुढे असे म्हटले आहे की, ‘माझी छोटी मुलगी नियती आणि आमच्या परिवारातील नवा सदस्य माझा मुलगा यशोवर्धन यांना त्यांच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीसाठी खूप शुभेच्छा. आमच्या आनंदात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार’. दिलिप यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी फोटो लाइक करत ‘जसे वडिल तशी मुलगी’ अशा कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

- Advertisement -

पांढऱ्या झालेल्या केसांनी लेक बोहल्यावर चढली

दिलिप यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नियतीला नवरीच्या वेशात पाहून तिची आई फार भारावून गेली आहे. नियतीच्या लग्नातील फोटोंमध्ये तिच्या पांढऱ्या झालेल्या केसांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आतापर्यंत झालेल्या लग्नातील नियतीचे लग्न हे सर्वांपेक्षा वेगळे ठरले आहे. नियतीने तिच्या पांढऱ्या झालेल्या केसांना कोणताही कलर न करता ती जशी आहे तशी लग्नाच्या बोहल्यावर उभी राहिली. नियतीने तिच्या लग्नात एक नवीन ट्रेंड तयार केला आहे.

नियती लग्नात गुजराती आऊटफिटमध्ये दिसली. नियतीने लाल कलरची गुजराती पद्धतीची साडी नेसली होती तर तिच्या नवऱ्याने सोनेरी कलरची शेरवानी घातली होती.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा त्यांची पत्नी प्रिया अहुजा अभिनेत्री सुनैना फौजदार,पलक सिद्धवानी,कुश शहा,समय शाह या कलाकारांनी लाडक्या जेठालालच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली होती.


हेही वाचा – Ankita Lokhande Vicky Jain Wedding: अंकिता आणि विक्की जैन राजस्थानी थाटात विवाहबद्ध, पहा फोटो

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -